१ ते १५ जुलै दरम्यान होणार सीबीएसई परिक्षा 

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 9 मे 2020

एैच्छिक पेपरचे गुण हे अंतर्गत मुल्यांकनाद्वारे देण्यात येतील.  सध्या देशामध्ये तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. जो १७ मे पर्यंत चालणार आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशभरातील सीबीएसई बोर्डच्या १० वी आणि १२ वी इयत्तेच्या परिक्षा स्थगीत करण्यात आल्या होत्या.


नवी दिल्ली :
सीबीएसई बोर्डच्या १० वी आणि १२ वी च्या जवळजवळ २९ विषयांच्या परिक्षा होतील. या परिक्षा फक्त मुख्य विषयांच्याच घेतल्या जाणार आहेत. ज्याद्वारे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी उपयोगी ठरतील. सर्वच राज्यांमध्ये इयत्ता पहिली पासून ते नववी पर्यंत तसेच इयत्ता अकरावीची परीक्षा न घेता या वर्गांतील मुलांना पुढील वर्गांत बढती देण्यात आली आहे.  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शुक्रवारी (दि.८) सीबीएसईच्या (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ)  १० वी आणि १२ वीच्या उरलेल्या परिक्षांबाबत माहिती दिली. लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या परिक्षा आता १ जुलै ते १५ जुलै दरम्यान घेतल्या जाणार आहेत. मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे ही माहिती दिली. 

मंत्री निशंक दहावी आणि बारावीच्या परिक्षांना बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत म्हणाले, विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनचा फायदा घेत परीक्षेसाठी जोरदार तयारी केली पाहिजे. फक्त मुख्य विषयांच्या परिक्षा घेतल्या जाणार आहेत. एैच्छिक पेपरचे गुण हे अंतर्गत मुल्यांकनाद्वारे देण्यात येतील.  सध्या देशामध्ये तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. जो १७ मे पर्यंत चालणार आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशभरातील सीबीएसई बोर्डच्या १० वी आणि १२ वी इयत्तेच्या परिक्षा स्थगीत करण्यात आल्या होत्या. आता या परिक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. 

WebTittle ::  CBSE exam will be held from 1st to 15th July

 


संबंधित बातम्या

Saam TV Live