सीबीएसई बारावीच्या परिक्षा जुलैमध्ये होणार?

Exam
Exam

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परिक्षा जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे. केंद्रीय शिक्षण खाते याबाबतच्या तारखा जाहीर करणार आहे. आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध राज्यांची मते जाणून घेऊन याबाबतचे निष्कर्ष पंतप्रधान कार्यालयाला कळविण्यात येणार आहेत. CBSE Twelfth Exams likely to be held in July 

त्यानंतर वरिष्ठ पातळीवर या परिक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळांनी आपल्या परिक्षा घ्यायच्या किंवा नाही याचा निर्णय कोरोनाच्या स्थानिक स्थितीनुसार घ्यावा, असे या बैठकीत सांगण्यात आले.

विविध राज्यांत कोरोनाच्या परिस्थितीमुळे दहावी-बारावीच्या परिक्षा घेण्यात आलेल्या नाहीत. जेईई आणि एनईईटी या परिक्षाही झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर लागलेले आहे. विद्यार्थ्यांच्या परिक्षांबाबत काय याबद्दल न्यायालयेही सरकारला विचारणा करत आहेत. त्या  १२ वी  बोर्डाच्या  परीक्षेबाबत संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार  पडली. 

बारावी  बोर्डाची  परीक्षा  आणि  प्रोफेशनल  कोर्सच्या एन्ट्रन्स परिक्षेबाबत यात  चर्चा झाली. सर्व  राज्यांचे  शिक्षण  मंत्री  या बैठकीला उपस्थित होते. राज्याच्या शिक्षण  मंत्र्यांकडून बैठकीत सुचना जाणून  घेण्यात आल्या. राजनाथ सिंह यांनी ही व्हर्च्युअल बैठक घेतली. केंद्रीय शिक्षण  मंत्री  रमेश  पोखरियाल, केंद्रीय मंत्री  प्रकाश  जावडेकर आणि स्मृती इराणी  या बैठकीला  उपस्थित होते. CBSE Twelfth Exams likely to be held in July 

या बैठकीत काही  राज्यांनी १२वीच्या  परीक्षे  बाबत  अनुकूलता दर्शवली. तर निवडक राज्यांनी बारावीच्या बोर्ड परिक्षांना विरोध दर्शवला. बारावी परिक्षा  घेण्याआधी  विद्यार्थाना  लस द्यावी, अशी भूमीका दिल्ली सरकारनं मांडली. कोरोनाच्या परिस्थितीत बारावीची परीक्षा घेण्यास दिल्ली सरकार अनुकूल नाही असे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देणे हे आमचे प्राधान्य आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा बघूनचं यासंदर्भातील निर्णय व्हावेत, अशी भूमिका महाराष्ट्राने या बैठकीत मांडली.

या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. एकतर मर्यादित विषयांचीच परिक्षा घ्यावी, असा एक तोडगा केंद्रीय शिक्षण खात्याने सुचवला. अन्यथा पूर्ण विषयांची परिक्षा घेऊन परिक्षेचा कालावधी तीन तासांवरुन दीड तास करावा आणि 'एमसीक्यू' पद्धतीचे प्रश्न ठेऊन परिक्षा घ्यावी, असा दुसरा तोडगा सुचविण्यात आला. 
Edited By - Amit Golwalkar


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com