शेतकरी आंदोलनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल, वाचा शेतकरी आंदोलनावरील हे सेलिब्रिटी वॉर

साम टीव्ही
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021
  • शेतकरी आंदोलनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
  • आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींचा आंदोलनाला पाठिंबा
  • पॉप सिंगर रेहानावर टीकेचा भडीमार

शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यावरुन आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी आणि भारतीय सेलिब्रेटी असं ट्विटरयुद्ध सुरू झालंय. तर दुसरीकडं राजकीय पक्षांमध्येही आरोप प्रत्यारोपांच्याही फैरी झडू लागल्यात.

दिल्लीत दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची आंतरराष्ट्रीय़ पातळीवर दखल घेण्यात आली. पॉप सिंगर रेहानानं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ट्विट केलं. तिच्या ट्विटनंतर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अक्षय कुमार यांनी रेहानावर टीका करणाऱ्या ट्विटची सरबत्ती केलीय. शेतकरी आंदोलनावरुन सेलिब्रेटींमध्ये ट्विटवॉर सुरु असताना राजकीय पक्षांमध्येही आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचं हे षडयंत्र असल्याचा आरोप केलाय.

 

तरुणाईला झालंय काय? पुण्यात खेळातल्या भांडणातून मित्राने केला खून, क्राईम पेट्रोल पाहून मित्राचा काढला काटा

आंतरराष्ट्रीय पातळीवर या आंदोलनाची दखल घेतली पण केंद्र सरकार या आंदोलनावर का बोलत नाही असा टोला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी लगावलाय.

दुसरीकडं रेहानावर टीकेची झोड उठवणाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समाचार घेतलाय.

शेतकरी आंदोलनावरुन सेलिब्रेटी एकमेकांसमोर उभे ठाकलेत. मात्र सेलिब्रेटींच्या ट्विटवॉरमध्ये शेतकरी हा मुद्दाच बाजुला पडू नये म्हणजे मिळवलं.


संबंधित बातम्या

Saam TV Live