केंद्राकडून 12 वीची परीक्षा रद्द; सीबीएससी'ने दिले दोन पर्याय 

साम टीव्ही ब्यूरो
बुधवार, 2 जून 2021

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSE इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.  कोरोना विषाणूच्या साथीची Corona Virus परिस्थिती पाहता केंद्र सरकारने Central Government काल  सीबीएसई 12 वीची परीक्षा रद्द केली.

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSE इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.  कोरोना विषाणूच्या साथीची Corona Virus परिस्थिती पाहता केंद्र सरकारने Central Government काल  सीबीएसई 12 वीची परीक्षा रद्द केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि सीबीएसईचे अध्यक्ष उपस्थित होते. (Center cancels 12th exam; CBSC has given two options) 

संबंधित बैठकीत सीबीएसई योग्य निकषांनुसार 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी पावले उचलेल. मात्र तरीही  मागील वर्षाप्रमाणेच, काही विद्यार्थी परीक्षा देण्यास उत्सुक असल्यास, अशा विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई कोविड परिस्थिती निवळल्यानंतर त्यांना विशेष पर्याय देईल, असेही सांगण्यात आले.

दुबई कंपनीकडून द्राक्ष शेतकऱ्यांची तीन कोटी रुपयांची फसवणूक

सीबीएससीकडून 12 वीची परीक्षा जुलै आणि 26 ऑगस्ट रोजी परीक्षा होण्याचा पर्याय  
मात्र,  केंद्रसरकारच्या या निर्णयाने समाधानी नसल्याचे मत सीबीएससीने व्यक्त केले आहे.  त्यामुळे सीबीएसईने 15 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान 12 वी बोर्डाची परीक्षा घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सीबीएसईच्या प्रस्तावानुसार सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर होईल.

यासह मंडळाने दोन पर्यायही दिले आहेत. यामध्ये अधिसूचित केंद्रांपैकी एकामध्ये 19 प्रमुख विषयांसाठी नियमित परीक्षा आयोजित करण्यात यावी, तर दूसरा पर्याय असा की, विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात, त्याच शाळांमध्ये अल्प-मुदतीसाठी परीक्षा घेण्यात यावी.  त्याचबरोबर  केंद्राच्या या निर्णयामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. 

दरम्यान, 23 मे 2021 रोजी झालेल्या आभासी बैठकीत शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासह सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिव उपस्थित होते. बैठकीत शिक्षणमंत्री निशंक यांनी राज्यांना 25 मे पर्यंत सूचना देण्याचे आवाहन केले होते.  त्यानंतर  1 जून रोजी ते बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणाही करणार होते.  मात्र त्यांना कोविडनंतरच्या प्रकृतीच्या समस्या होऊ लागल्यामुळे त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे 12 वीच्या परीक्षांबाबत निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.  मात्र पंतप्रधानांनी याची दाखल घेत प्रामुख्याने बारावीच्या परीक्षांबाबत तातडीने बैठक बोलवत निर्णय घेतला.   


संबंधित बातम्या

Saam TV Live