45 वर्षांपुढील सर्वांचे दोन आठवड्यांत लसीकरण करा: केंद्राचे राज्यांना निर्देश

Corona Vaccine
Corona Vaccine

नवी दिल्ली : कोरोना (Corona) रूग्णांची देशभरात वाढणारी संख्या पहाता राज्य सरकारांनी व केंद्रशासित प्रदेशांनी 45 वर्षांच्या पुढील सर्वच नागरिकांना पुढच्या 2 आठवड्यांत युध्दपातळीवर लसीकरण करावे असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

कोरोनानं (Corona)  पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं बोलंलं जात आहे. अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत आहे.  केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहीलेल्या ताज्या पत्रात याबाबत स्पष्ट सूचनावली देण्यात आली आहे.

केंद्राने सुरुवातीला लसीकरणाच्या (Corona Vaccine) दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षांपुढील व ज्यांना आधीपासून काही आजार असतील त्या नागरिकांना लसीकरण करण्याचे निर्देश सुरुवातीला दिले होते.  Center orders States to Vaccinate everyone over the age of forty five in two weeks

मात्र महाराष्ट्रासह देशभरात रूग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यावर 45 वर्षांपुढील सर्वच नागरिकांना लसीचा पहिला डोस लगेच व 28 दिवसांनी दुसरा डोस द्यावा असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच केला होता. त्या अनुषंगाने ताज्या पत्रात आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे, की राज्यांनी सर्व जिल्ह्यांतील 45 वर्षांपुढील सर्वच नागरिकांना लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट पुढच्या 2 आठवड्यात पूर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलावे लागतील.

लसीकरणाबाबतची आकडेवारी केंद्राला तातडीने कळवावी लागेल. विशेषतः ज्या जिल्ह्यांत कोरोना रूग्णसंख्येचा पुन्हा उद्रेक झाला आहे.  त्या जिल्ह्यांत लसीकरण मोहीमv(Vaccination campaign) वेगाने राबवावी असेही पत्रात म्हटले आहे. देशातील ज्या 10 जिल्ह्यांत रुग्णवाढीचा विस्फोट झाला आहे.  त्यातील मुंबई-पुणे-नागपूरसह 8 जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.  Center orders States to Vaccinate everyone over the age of forty five in two weeks 

दरम्यान कोरोना संक्रमित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या किमान 30 टक्के लोकांचा तातडीने छडा लावून त्यांना सक्तीच्या गृह विलीगीकरणात ठेवावे असेही निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत. "टेस्ट-ट्रॅक-ट्रीट' ची त्रिसूत्री व आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबतची जनजागृती या उपायांसह राज्यांनी साथ आटोक्‍यात आणण्याची पावले उचलावीत असे पुन्हा बजावण्यात आले आहे.

देशभरात कोरोनाची परिस्थिती "वाईटातून अधिक वाईटाकडे' सरकू लागल्याने राज्य सरकारांनी विशेषतः सर्वाधिक फैलाव असलेल्या दिल्ली(Delhi)- महाराष्ट्रासह 6 राज्यांनी दक्षता घेण्याची गरज केंद्राने पुन्हा बोलून दाखविली आहे. आता नवीन रूग्णसंख्येचा छडा लावणे व ती आटोक्‍यात आणणे यासाठी जिल्हाकेंद्रीत धोरण राज्यांनी राबवावे व ग्रामीण भागाकडेही विशेष लक्ष पुरवावे असेही केंद्राने म्हटले आहे.  Center orders States to Vaccinate everyone over the age of forty five in two weeks

Edited By-Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com