केंद्राने महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या : फडणवीसांचा दावा

अरुण जोशी
गुरुवार, 29 एप्रिल 2021

देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात रेमडीसीवर इंजेक्शन Remdisivi आणि लसींची उपलब्धता कमी प्रमाणात होत असल्याची माहिती दिली. तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्याना लसीचा साठा पुरविण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांना Chief MInister करणार असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अमरावती : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanaivs यांनी आज अमरावतीच्या Amravati सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील कोविड रुग्णालयाला Covid Hospital भेट दिली. यावेळी फडणवीस यांनी जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती,औषधांचा साठा, बेड्स तसेच ऑक्सिजन पुरवठा तसेच लसीकरण मोहीम याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून जाणून घेतले. Center Provided Maharashtra Highest Corona Vaccines Claim by Devendra Fadanavis 

त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात रेमडीसीवर इंजेक्शन Remdisivi आणि लसींची उपलब्धता कमी प्रमाणात होत असल्याची माहिती दिली. तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्याना लसीचा साठा पुरविण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांना Chief MInister करणार असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्राकडून महाराष्ट्राला लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याच्या आरोपांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनीच सांगितल्यानुसार महाराष्ट्राने सर्वात जास्त लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे केंद्राकडून लसीच्या पुरवठ्याबाबत प्रश्न निर्माण करण्यात काही तथ्य नसल्याचं फडणवीस म्हणाले. Center Provided Maharashtra Highest Corona Vaccines Claim by Devendra Fadanavis 

अमरावती जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन अमरावती विभागातील पाचही जिल्ह्याचा आढावा  घेतला व संपूर्ण विभागातील कोरोनाची Corona परिस्थिती जाणून घेतली.सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील भेटी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टरांशी देखील संवाद साधत अभिनंदन केले. तसेच मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या सेवेबद्दल त्यांचे आभारही मानले. 

अद्यापही कोरोना महामारीचा काळ किती दिवस राहील याचा अंदाज नसल्याने येणाऱ्या काळात सर्व रुग्णसेवकांना अशाच पद्धतीने काम करावे लागणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. Center Provided Maharashtra Highest Corona Vaccines Claim by Devendra Fadanavis 

यावेळी अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा, सभागृह नेते तुषार भारतीय,माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule, माजी आमदार डॉ. सुनील देशमुख, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षा निवेदिताताई दिघडे, शहराध्यक्ष किरण पातुरकर, दिनेश सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे यांच्यसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live