शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाला मोदी सरकार जबाबदार - काँग्रेसचा आरोप, तर दिल्लीत इंटरनेटसेवा बंद

साम टीव्ही
मंगळवार, 26 जानेवारी 2021

दरम्यान, दिल्ली येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक होण्याला संपूर्णपणे केंद्र सरकार व पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत. या  घटनेची शब्दात निंदा करून  मोदी सरकारने हटवादीपणा सोडून कृषी विधेयक मागे घ्यावेतअशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीय.कृषी कायद्यांना विरोध करत असलेल्या शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर मार्च काढला मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत थेट लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला. त्यापूर्वी पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. आंदोलकांनी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्नही केला. तर आंदोलकांनी बसेसचं नुकसानही केलं. आंदोलकांच्या हल्ल्यात काही पोलिसही जखमी झाले.
प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तरीही पोलिसांना न जुमानता आंदोलक लाल किल्ल्यावर दाखल झाले. मोठ्या संख्येनं आलेल्या जमावानं लाल किल्ल्यावर आपला झेंडा फडकावला. त्यामुळे शेतकरी आंदोलन सरकारच्या हाताबाहेर गेलंय की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. थोड्या वेळातच पोलिसांनी लाल किल्ल्यावर पुन्हा ताबा मिळवत आंदोलकांना तिथून परतावून लावलं. 

दरम्यान, दिल्ली येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक होण्याला संपूर्णपणे केंद्र सरकार व पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत. या  घटनेची शब्दात निंदा करून  मोदी सरकारने हटवादीपणा सोडून कृषी विधेयक मागे घ्यावेतअशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

शेतकरी आंदोलनात शरद पवारांचा मोदी सरकारसह राज्यपालांवर घणाघात, म्हणे असे राज्यपाल कधी पाहिले नाहीत...

शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. सिंघू, टिकरी, गाजीपूर, मुकरबा चौक, नांगलोई भागात इंटरनेट बंद करण्यात आलंय. तसच इंडिया गेटकडे जाणारे सर्व रस्तेही बंद करण्यात आले आहेत. 

VIDEO | दिल्लीतील शेतकरी आंदोलन चिघळलं, पोलिस आणि आंदोलक आमने-सामने, वाचा काय घडलं?

दिल्लीतल्या काही भागात मेट्रोसेवाही बंद करण्यात आलीय. सकाळी नवी दिल्लीत शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च सुरू होता. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांनी बसेसची तोडफोड केली. तसच लाल किल्लावरही शेतकऱ्यांनी धडक दिली. आता परिस्थिती नियंत्रणात असली तरी सुरक्षेचा उपाय म्हणून काही भागात इंटरनेट, टेलिकॉम तसच मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आलीय. 
 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live