कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ​​​​​​​केंद्राचे पथक जालन्यात दाखल

साम टीव्ही ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

राज्यातली कोरोनाची स्थिती पाहून आता केंद्रीय आरोग्य खाते अॅक्शन मोडवर आले आहे. आज केंद्राचे आरोग्य पथक जालना (Jalna) जिल्ह्यातील राजूर (Rajur) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील कोविड सेंटर (Covid Center) येथे दाखल झाले.

जालना: राज्यातली कोरोनाची स्थिती पाहून आता केंद्रीय आरोग्य खाते अॅक्शन मोडवर आले आहे. आज केंद्राचे आरोग्य पथक जालना (Jalna) जिल्ह्यातील राजूर (Rajur) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील कोविड सेंटर (Covid Center) येथे दाखल झाले.

त्यांनी कोविड सेंटर मधील व्यवस्था कशी आहे, रुग्णावर केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीचा आढावा घेतला आहे.  हे पथक जिल्ह्यात राहून पुढील चार दिवस संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहे.  राज्याच्या आरोग्य यंत्रणेकडून केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीचा आढावा घेऊन ते याचा अहवाल केंद्राला Government of India सादर करणार आहेत.

हे दोन सदस्यीय पथक चार दिवस जिल्ह्यात  असणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले यांनी दिली. हे पथक आत्ता हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रवाना झालेले आहे. तिथे ते त्या ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरणाचा Corona Vaccinationआढावा ही घेणार आहे.

राज्यातील कोरोनाची (Corona) स्थिती हाताळण्यात राज्य Maharashtra आरोग्य विभागाची होत असलेली दमछाक होताना दिसून येत आहे. सरकार जनतेच्या आरोग्याबाबत सतर्क राहून प्रयत्न तर करत आहे. पण सोयीसुविधा पुरवताना काही ठिकाणी प्रचंड ताण येत आहे. काही जिल्ह्यांच्या भागात कोरोना आपले पाय पसरतोय तर त्यासाठी त्या भागात लसीकरण (Vaccination) मोहीम देखील जोरदार प्रमाणात सुरु आहे. लसीकरणचे ठरवलेले लक्ष्य पूर्ण करून लवकरात लवकर कोरोना मुळे वाढत चाललेला मृत्युदर कमी करावयाचा आहे.

 

Edited by - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live