दारु, गुटखा विक्रीसाठी केंद्राची परवानगी मात्र या असतील अटी...

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 मे 2020

हवाई प्रवास
- रेल्वे सेवा
- मेट्रो सेवा
- आंतरराज्य रस्ते वाहतूक
- शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था
- हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि इतर हॉस्पिटॅलिटी सेवा

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने कोरोना लाॅकडाऊनचा कालावधी दोन आठवडे वाढविला असून, त्याची अंमलबजावणी चार मे पासून होणार आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या दुसऱ्या लाॅकडाऊनची मुदत तीन मे रोजी संपत आहे. असे असले तरी ग्रीन झोनमध्ये काही उद्योग, दुकाने सुरू करण्यासाठी काही अटींंवर गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे. यात मद्य, पान व गुटखा दुकानांचाही समावेश आहे.

या दुकानांमध्ये दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फूटांचे अंतर असणे आवश्यक आहे. तसेच दुकानात एका वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक नको, असे बंधन घालण्यात आले आहे. देशात दारू दुकाने सुरू करण्याची मागणी अनेक नेत्यांनीही केली होती. ही दुकाने बंद असल्याने सरकारच्या महसुलावरही परिणाम होत होता. तो आता भरून निघेल, अशी अपेक्षा आहे.  सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क परिधान करणे आवश्यक आहे. काम करण्याच्या ठिकाणी देखील सोशल डिस्टसिंग सक्तीचे आहे. तसेच अशा जागांचे निर्जुंतीकरण करण्याची काळजी घ्यावी लागणार आहे. 

कोरोना प्रादुर्भावाचा झोन कोणताही असला तरी संध्याकाळी सात ते सकाळी सात या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना बंदी घालण्यात आली आहे.  ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील जिल्ह्यासाठी स्वतंत्र सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Liquor stores & paan shops will be allowed to function in green zones while ensuring minimum six feet distance (2 gaz ki doori) from each other & ensuring that not more 5 persons are present at one time at the shop: MHA on the extension of #lockdown for two weeks from May 4

— ANI (@ANI) May 1, 2020

ग्रीन झोन म्हणजे जिथे कोरोनाची एकही रुग्ण गेल्या 21 दिवसांत सापडलेला नाही.

रेड झोन- एकूण रुग्णांची संख्या, वाढीचा वेग, टेस्टिंगचे प्रमाण यावर ठरविण्यात येणार आहे.

जे जिल्हे ग्रीन किंवा रेड झोन नसतील ते आॅरेंजमध्ये गृहित धरले जातील.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील 733 जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी केली आहे. यात देशातील 130 जिल्हे रेड झोनमध्ये असून, महाराष्ट्रातील पुणे, मुंबईसह 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनचा कालावधी 3 मे रोजी संपल्यानंतर या जिल्ह्यांत निर्बंध लागू राहणार आहेत. याचवेळी ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात येतील तर ग्रीन झोनमध्ये निर्बंध अतिशय कमी प्रमाणात असतील. याचबरोबर दिल्ली, मुंबई, कोलकता, हैदराबाद, बंगळूर आणि अहमदाबाद या महानगरांमध्ये लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतरही निर्बंध असणार आहेत. राज्यात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक मुंबई आणि पुण्यात झाला आहे. येथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या हा भाग रेड झोनमध्ये आहे. येथील निर्बंध 3 मेनंतर आणखी वाढतील. मुंबई, पुण्यासह ठाणे, पालघर, सातारा, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, अकोला, जळगाव आणि रायगड हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.

लॉकडाउमध्ये या गोष्टींना बंदी
- हवाई प्रवास
- रेल्वे सेवा (स्थलांतरित कामगारांसाठीच्या विशेष गाड्यांचा अपवाद)
- मेट्रो सेवा
- आंतरराज्य रस्ते वाहतूक
- शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था
- हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि इतर हॉस्पिटॅलिटी सेवा
- गर्दीची ठिकाणे - चित्रपटगृहे, मॉल, जिम, क्रीडासंकुले
- अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर नागरिकांना रात्री 7 ते सकाळी 7 संचारबंदी
- ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी घरातच राहावे. केवळ अत्यावश्‍यक गरजा आणि वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडता येईल.
- सर्व धार्मिक स्थळे
- धार्मिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम


संबंधित बातम्या

Saam TV Live