कोरोना परिस्थिती निरीक्षणासाठी केंद्राचे पथक परभणीत दाखल..

राजेश काटकर
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

केंद्रीय पथकाचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा प्रारंभ झाला असून परभणी शहरातील विविध केंद्रांवर पथक पाहणी करीत आहे. 

परभणी: केंद्रीय पथकाचे Central Team अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा प्रारंभ झाला असून परभणी Parbhani शहरातील विविध केंद्रांवर पथक पाहणी करीत आहे.

केंद्रीय पथकाचे अधिकारी दिनेश बाबू, डॉ रंजना सोळंके, परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर उपजिल्हाधिकारी डॉ संजय कुंडेटकर, मंगेश सुरवसे सुचिता पाटेकर यांच्या सह अनेक अधिकारी हे पथकासोबत आहेत. To 

मराठवाड्यातील Marathwada विविध भागात केंद्र सरकारच्या वतीने दहा डॉक्टरांचे पथक दाखल झाले आहे.  नांदेड Nanded, परभणी Parbhani सह मराठवाड्याच्या उर्वरित भागात हे पथक पाहणी करणार आहे. परभणी जिल्ह्यातील कोरोना Corona प्रादुर्भावाची परिस्थिती पाहण्यासाठी केंद्राचे एक विशेष पथक परभणीत दाखल झाले आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली आहे. Central Government Team Arrived In Parbhani to Monitor Corona Situation

विशेष म्हणजे दोन अधिकार्‍यांमध्ये एक महिला प्रतिनिधी सुद्धा आहे. या दोन अधिकाऱ्यांच्या संदर्भात पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून परभणीचे डी डी आर मंगेश सुरवसे आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक सुचिता पाटेकर यांच्यावर प्रामुख्याने जबाबदारी देण्यात आली आहे. परभणी शहर आणि परभणी ग्रामीण भागात या दोन दिवसात हे पथक पाहणी करणार आहे आणि हा पाहणी अहवाल केंद्र सरकारला सादर होणार असल्याची माहिती मिळत आहे .

Edited by - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live