पूजा चव्हाण प्रकरणावर केंद्रीय तपास यंत्रणांचंही लक्ष ?

साम टीव्ही
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाण कथित आत्महत्येप्रकरणी अद्यापही पोलिस ठोस निष्कर्षापर्यंत न पोहोचल्याने या प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे नव्याने तपास केला जाण्याची शक्यता वर्तावली जातेय. 

पूजा चव्हाण कथित आत्महत्येप्रकरणी अद्यापही पोलिस ठोस निष्कर्षापर्यंत न पोहोचल्याने या प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे नव्याने तपास केला जाण्याची शक्यता वर्तावली जातेय. 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी थेट शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांवर आरोप होत असल्याने विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झालाय. पोलिस तपासात दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने थेट केंद्राकडून तपास यंत्रणा कामाला लावल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिलीय. 

पूजा चव्हाण हीने केलेल्या कथित आत्महत्येच्या ठिकाणाचा आणि कथित घटनेचा केंद्रीय तपास य़ंत्रणांमार्फत नव्याने अभ्यास केला जाणार असल्याचं समजतंय. याशिवाय यवतमाळ शासकीय रुग्णालयात गर्भपात झालेली पूजा अरूण राठोड कोण? गर्भपात झाला त्यावेळी कर्तव्यावर असलेले विभागप्रमुख डॉ. रोहिदास चव्हाण अचानक रजेवर का गेले ? तसंच पुणे पोलिसांनी डॉ.चव्हाण यांचा जबाब नोंदवलाय का? पुजा चव्हाणने आत्महत्या केली त्यावेळी तिच्यासोबत असलेले दोघे तरूण कोण आणि त्यांचा आरोप असलेल्या मंत्र्यांशी संबंध काय? असे अनेक मुद्दे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचं समजतंय. 

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुण्याच्या वानवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालीय.तब्बल चार आठवड्यानंतरही पुणे पोलिसांकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा ठोस तपास झाला नसल्याचं चित्र आहे. शिवाय या प्रकरणाचे धागेदोरे परळी तालुक्यातील वसंतनगर तांड्यापासून पुणे आणि यवतमाळपर्यंत पोहचत असल्याने पोलिस तपासात एकसूत्रता दिसत नाहीए. हीच बाब हेरून या प्रकरणी सरकारची कोंडी करण्याच्या दृष्टीने विरोधकांनी पावलं टाकायला सुरूवात केलीय. 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live