मध्य रेल्वेची फुकट्या प्रवाशांवर कारवाई ( पहा व्हिडिओ )

local train
local train

मुंबई - मध्य रेल्वेच्या Central Railway  मुंबई विभागाने Mumbai  रेल्वेतून  तिकिट Ticket प्रवास करणाऱ्यांवर विशेष मोहिम  सुरू केली आहे. या कारवाई Action दरम्यान मध्य रेल्वे प्रशासनाने तब्बल 75 हजार फुकट्या प्रवाशांवर free passengers कारवाई केली आहे. या कारवाईतून रेल्वेने कोट्यावधी रुपयांचा दंड Penalty जरी वसूल केला असला. तरी फुकट्या प्रवाशांची  संख्या काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन अशा फुकट्या प्रवाशांवर आणखी कठोर कारवाई करण्याच्या विचारात आहे. Central Railways action on free passengers

मध्य रेल्वेने 1 एप्रिल ते 21 मे पर्यंत रेल्वेतून विना तिकिट प्रवास करणाऱ्या 75  हजार 793 जणांवर आतापर्यंत कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान रेल्वेने या फुकट्या प्रवाशांकडून 3 कोटी 97 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. माञ 14 एप्रिलच्या राञीपासून लोकल सर्व सामान्य नागरिकांसाठी बंद केल्यानंतर ही अत्यावश्यक सेवा वगळता. इतरही प्रवाशी प्रवास करताना आढळून आले.  तर 17 एप्रिल 2021 ते 21 मे पर्यंत तोंडाला मास्क नसलेल्या 1 हजार 61 प्रवाशांवर रेल्वेने दंडात्मक कारवाई केली आहे.

स्थानकात प्रवेशाआधी तिकीट, ओळखपत्राची तपासणी करतानाच बनावट ओळखपत्र बाळगल्याचे दिसताच फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले. यामध्ये सर्वाधिक महापालिकेचे बनावट ओळखपत्र पकडण्यात आले. सुमारे 80 टक्के बनावट ओळखपत्र बृन्हमुंबई महापालिकेचे पकडण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com