पुण्यात पेट्रोलचे शतक !

सागर आव्हाड
सोमवार, 31 मे 2021

पुण्यात आज पेट्रोल दराने शंभरी पार केली असून आज पेट्रोलचा दर 100.15 रुपये झाला आहे. 

पुणे : दिवसेंदिवस देशभरात इंधनदरात Fuel Price वाढ Increase सुरूच आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात आधीच शंभरी Century पार करणाऱ्या पेट्रोलने आता पुण्याला देखील सोबत घेतले आहे ! आज पुण्यात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. Century of petrol in Pune 

राज्यात पेट्रोलच्या दराने अनेक ठिकाणी शंभरी गाठली आहे. तर काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत. पुण्यातही Pune आज पेट्रोल Petrol दरात वाढ झाली आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 100.15 रुपये प्रति लिटरवर पोहचला आहे.

सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरांवर सामान्यांमधून मात्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. पुण्यात पेट्रोलचा आजचा दर हा 100.15 रुपये प्रति लिटर वर जाऊन पोहोचला आहे. डिझेल Diesel दर 90.72 रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर पॉवर पेट्रोलचा दर या आधीच शंभरीच्या पार गेला असून आज 103 रुपये प्रतिलिटर झाला आहे. Century of petrol in Pune   

शेती उपयोगी साहित्याची चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक

पेट्रोल दरवाढ सध्या सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. पुण्यात गेल्या आठवड्यापासून पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ सुरूच आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात पेट्रोलचे दर 99 रुपयांच्या आसपास स्थिर होते.

Edited By ; Krushanarv Sathe

हे देखील पहा -


संबंधित बातम्या

Saam TV Live