चहल-धनश्रीचा वर्कआउट व्हिडिओ; चाहत्याने घेतली फिरकी

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 जून 2021

चहल आणि त्याची पत्नी धनश्री सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. विशेषत: धनश्री तिच्या डान्सचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) सोशल मीडियावर आपली पत्नी धनश्रीसोबत (Dhanashree Verma) वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चहल आणि त्याची पत्नी धनाश्री वर्कआऊट दरम्यान एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते कमेंट करत असतात.  तसेच चहलने  शेअर केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर काही चाहते गमतीशीर कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने चहलला पत्नीबरोबर नव्हे तर 'ग्रेट खली' बरोबर व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. चहलला वजन वाढवण्याचा सल्लाही एका चाहत्याने  आहे.(Chahal-Dhanashree's workout video)

चहल आणि त्याची पत्नी धनश्री सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. विशेषत: धनश्री तिच्या डान्सचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. धनश्रीही चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. चहलला इंग्लंड दौर्‍यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. चहल आता श्रीलंका दौर्‍यावर भारतीय संघात सामील होऊ शकेल.

PSL च्या सुरवातीपूर्वीच खेळाडू गंभीर जखमी; पाहा VIDEO

भारतीय संघाला श्रीलंका दौर्‍यावर (India Sri Lanka Tour) तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी खेळला जाणार आहे. भारतीय संघ  श्रीलंका दौर्‍याचा शेवटचा सामना 25 जुलै रोजी खेळणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची लवकरच निवड केली जाईल.  

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live