नाशकात नवनिर्माणाचं आव्हान राज ठाकरे नाशकात डेरेदाखल

साम टीव्ही
शनिवार, 6 मार्च 2021

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवी उभारी देण्याबरोबरच आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवी उभारी देण्याबरोबरच आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

नाशिक महापालिकेची निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असतानाच विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल सव्वा वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशकात दाखल झालेत.. एका विवाह सोहळ्यानिमित्त जरी ते नाशकात दाखल झाले असले तरीही 7 मार्चपर्यंत ते राजकीय बैठका घेणार आहेत. 

मनसेच्या स्थापनेनंतर नाशिककरांनी राज ठाकरेंच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. 3 आमदार आणि महापालिकेची सत्ताही मनसेच्या ताब्यात दिली होती. 

मात्र स्थानिक स्तरावरील नेत्यांमधले वाद आणि बड्या नेत्यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी यामुळे मनसेची नाशकात अल्पावधीतच वाताहत झाली. 

गेल्या महापालिका निवडणुकीत तर 40 वर असणारी मनसे नगरसेवकांची संख्या जेमतेम 5 वर आलीय.
त्यामुळे नाशकात पक्षाचं पुन्हा एकदा नवनिर्माण करण्याचं आव्हान राज ठाकरेंसमोर आहे.

नाशिक महापालिकेवर सत्ता गाजवण्यासाठी सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागलेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पक्ष कार्यकर्त्यांना नेमका काय कानमंत्र देतात आणि नेमकी काय रणनीती ठरवतात, हे पाहणं महत्वाचं असेल 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live