येत्य़ा दोन दिवसात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता 

साम टीव्ही न्यूज
रविवार, 10 मे 2020

रायगडमध्येही रविवारी आणि सोमवारी पावसाचा अंदाज आहे. रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी गडगडाटासह वीजांचा लखलखाटही होऊ शकतो तर सोमवारी पावसाची शक्यता आहे.ढगांच्या द्रोणीय स्थितीमुळे मध्य भारतात तसे दक्षिण द्विपकल्पामध्ये येत्या पाच दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस, ढगांचा गडगडाट होऊ शकतो, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

 

 दोन दिवसांमध्ये उत्तर आणि दक्षिण कोकणातही पावसाची शक्यता आहे तर त्यानंतर मंगळवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हे वातावरण कायम राहू शकते. रविवारी ठाण्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर खोकला आणि सर्दीमुळे चिंता वाढत असताना पुढील पाच दिवसांमध्ये वातावरणात काही प्रमाणात बदल होण्याचा अंदाज आहे. आज, रविवार आणि सोमवारी राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह तुरळक पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. 

विदर्भात अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे याची व्यापकता अधिक असेल. या चारही जिल्ह्यांमध्ये तसेच यवतमाळमध्ये सोमवार ते बुधवार या काळातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील. यासंदर्भात नागरिकांना अद्ययावत केल्या जाणाऱ्या तापमानाचा अंदाज पाहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
 

मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली येथे रविवारी जोरदार वाऱ्यांसह पाऊस तसेच गडगडाट आणि वीजांचा लखलखाटाचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड, उस्मानाबाद, लातूर येथे मंगळवारपर्यंत पावसाची आणि गडगडाटाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे येथे रविवार आणि सोमवारी दोन्ही दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे मंगळवारपर्यंत अशी स्थिती कायम राहू शकते. 

रायगडमध्येही रविवारी आणि सोमवारी पावसाचा अंदाज आहे. रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी गडगडाटासह वीजांचा लखलखाटही होऊ शकतो तर सोमवारी पावसाची शक्यता आहे.ढगांच्या द्रोणीय स्थितीमुळे मध्य भारतात तसे दक्षिण द्विपकल्पामध्ये येत्या पाच दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस, ढगांचा गडगडाट होऊ शकतो, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यामध्ये मुंबई आणि पालघरमध्ये वातावरण कोरडे असण्याची शक्यता आहे. ठाण्यात रविवारी तुरळक पावसाची शक्यता आहे. 

 

WebTittle ::  Chance of rain with strong winds in the next two days


 

संबंधित बातम्या

Saam TV Live