दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

पुणे : विजांच्या कडकडाटासह शहरात मंगळवारी रात्री दोन वाजल्यापासून धुवाधार पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १५.९ मिलीमिटर पावसाची नोंद शिवाजीनगर येथे झाली. 

अरबी समुद्रात गुजरात किनारपट्टीच्या जवळ हिक्का घोंगावत आहे. त्यामुळे चक्रीवादळीकडे सर्व बाष्प जमा होत आहे. त्याता परिणाम शहरातील किमान तापमानात वाढण्यावर झाला. त्यातून स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे पुणे शहरात रात्रीपासून विजांचा कडकडाट सुरू झाला. मध्यरात्री दोन वाजता जोरदार पावसाला सुरवात झाली. पहाटे चार वाजेपर्यंत पाऊस पडत होता.

सकाळपासून पुन्हा उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. मात्र दुपारनंतर पावसाच्या मध्यम काही सरी पडतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Web Title:Chance of showers in the afternoon

संबंधित बातम्या

Saam TV Live