सावधान  पुणेकरांनो, आज जोरदार पावसाची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पुणे : पुणेकरांनो, संध्याकाळीसुद्धा तुम्ही लवकर घरी पोहचा. कारण आजही संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह शहरात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे

शहरात आत्ता तुम्हाला आकाश अशंतः ढगाळ दिसत असेल. पण त्याच वेळी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. दुपारपर्यंत ऑक्टोबर हीट वाढेल. त्यामुळे बाष्पिभवनाचा वेगही वाढणार आहे. सध्या हवेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त आद्रता आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून शहरात संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

शिवाजीनगर  येथील वेधशाळेत सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २१.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पाषाण येथे सर्वाधिक म्हणजे ४४ तर, लोहगाव येथे १.८ मिलीमीटर पाऊस पडला.

Web Title: Chances of torrential rains today evening in Pune

संबंधित बातम्या

Saam TV Live