शहा-पवारांच्या भेटीवर चंद्रकांतदादांचे मोठे विधान; म्हणाले त्यांचा इतिहास हिशेब चुकते करण्याचा

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

नरेंद्र मोदी, अमित शहा हे एकाद्याच्या भेटीनंतर अन्यायावर पांघरूण घालणारे नेते नाहीत. तर  एकऐकाचा हिशोब चुकता करणं हा त्यांचा  इतिहास आहे. अशी ​प्रतिक्रिया  चंद्रकांत पाटील यांनी  पवार आणि अमित शहा यांच्या भेटीवर  दिली

पंढरपूर: आमचे नेते पंतप्रधान (Prime minister) नरेंद्र मोदी, गृहमंत्री (Home Minister) अमित शहा हे एखाद्या व्यक्तीच्या भेटीनंतर कुठल्या अन्यायावर पांघरूण घालणारे नेते नाहीत. तर एकेकाचा हिशोब चुकता करणं हा त्यांचा  इतिहास आहे. अशा शब्दात  भाजपाचे (BJP) प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. Chandrakant Patils statement on the meeting between Shah and Pawar

वाझे (Sachin Vaze) प्रकरणावर पडदा टाकला यासाठी शरद पवारांनी अमित शहा यांची भेट घेतली का? या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. यापुढच्या काळात आणखी कोणकोणते राजकीय हिशोब चुकते केले जाणार  याच्या विषयी आता तर्कवितर्क लढवले जावू लागले आहेत.

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज चंद्रकांत  पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर टिका केली. राज्यात अलकीकडे राजकारणाचं गुन्हेगारीकरन झाले आहे. आणि आता येत्या काळात ते लोकांच्या समोर मांडले जाणार आहे. Chandrakant Patils statement on the meeting between Shah and Pawar

राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून राजकारणाचं गुन्हेगारीकर झालं आहे. ते लोकांसमोर आणण्यासाठी किमान 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये येत्या काळात राज्यभरात किमान 20 हजार सभा (Assembly) घेण्यात येतील, त्याची सुरवाती केली आहे. मी दोन दिवसात 9 सभा घेतल्या आहेत. असेही त्यांनी सांगितले

Edited by- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live