छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांसमवेत बघितला तान्हाजी चित्रपट; म्हणाले, लवकरच करमुक्त करणार

सरकारनामा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

 

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांनी आपल्या व्यस्त शेड्युल मधून काल कार्यकर्त्यांसमवेत नाशिकच्या सिटी सेंटर मॉल येथील सेनेमॅक्स सभागृहात तान्हाजी चित्रपट बघितला

नाशिक  : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांनी आपल्या व्यस्त शेड्युल मधून काल कार्यकर्त्यांसमवेत नाशिकच्या सिटी सेंटर मॉल येथील सेनेमॅक्स सभागृहात तान्हाजी चित्रपट बघितला. 

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप कार्यक्रमात तसेच विविध प्रश्नांसंदर्भात राज्यभर दौरे केले. त्यानंतर गेल्या चार दिवसापासून नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळ काढत त्यांनी मनोरंजन आणि कार्यकर्त्यांसमवेत वेळ मिळावा यासाठी त्यांच्यासाठी आज तान्हाजी या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन केले होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, कोंदजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, समाधान जेजुरकर, भालचंद्र भुजबळ, कैलास मुदलियार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, मनोहर कोरडे, यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WebTittle:: Chhagan Bhujbal sees the Tanhaji movie with activists; Said, will soon be tax free


 

संबंधित बातम्या

Saam TV Live