राजीनामा देऊन जर आरक्षण मिळणार असेल तर उद्या देतो - छत्रपती संभाजीराजे  

raje sambhaji
raje sambhaji

सोलापूर -  मराठा आरक्षण Maratha Reservation सुप्रीम कोर्टाने Supreme Court रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे Chhatrapati Sambhaji Raje हे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. आज सकाळी त्यांनी कोल्हापुरातून राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन या दौऱ्याला सुरुवात केली.  Chhatrapati Sambhaji Raje is on a tour of Maharashtra 

जर खासदारकीचा राजीनामा देऊन मराठा आरक्षण मिळणार असेल तर उद्याच देतो अशी उद्विग्न प्रतिक्रिया संभाजीराजेंनी सोलापुरात दिली आहे. कोल्हापुरातून सुरु झालेला हा छत्रपती संभाजीराजेंचा दौरा पंढरपूर,तुळजापूर,उस्मानाबाद,नांदेड,नाशिक आणि शेवटी मुंबई असा असणार आहे. 

हे देखील पहा -

हा महाराष्ट्र दौरा कोणत्याही सरकार किंवा पक्षाविरोधात नाही आहे असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केल आहे. तर दौरा झाल्यानंतर येत्या 28 में रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची देखील संभाजीराजे भेट घेणार आहेत.  Chhatrapati Sambhaji Raje is on a tour of Maharashtra 

दरम्यान,आरक्षण रद्द होण्या अगोदरच्या नियुक्त्या राज्य सरकारने कराव्यात अशा सूचना ही यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्या आहेत. तर सारथी संस्थेची दुरावस्था आणि मराठा विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचा प्रश्न ही प्रलंबित आहे त्यावर राज्य सरकारने तात्काळ पावलं उचलावीत असं ही छत्रपती संभाजीराजे यावेळी म्हणाले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com