मराठा आरक्षणावरुन छत्रपती संभाजीराजे आणि विजय वडेट्टीवार वाद टोकाला, वडेट्टीवारांबाबत छत्रपती संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट

साम टीव्ही
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

 

  • छत्रपती संभाजीराजे-विजय वडेट्टीवार वाद टोकाला
  • वडेट्टीवारांबाबत छत्रपती संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट
  • 'वडेट्टीवार खासगीत म्हणतात, मराठा समाजाला OBCत घ्या'

मराठा आरक्षणावरुन छत्रपती संभाजीराजे आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद विकोपाला पोहचलाय. खासदार छत्रपती संभाजीराजेंनी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवारांबाबत मोठा खुलासा केलाय.

पाहा संभाजीराजे आणि विजय वडेट्टीवारांच्या वादाची संपूर्ण माहिती-

मराठा आरक्षणावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती आणि बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद टोकाला पोहोचलाय. व़डेट्टीवारांबाबत छत्रपती संभाजीराजेंनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. वडेट्टीवार खासगीत मराठा समाजाला ओबीसीत घ्या, अशी भूमिका घेतात, असा गौप्यस्फोट संभाजीराजेंनी केलाय.

हेही वाचा -

नोकरी एसटीची आणि चाकरी दुसऱ्याची! वाचा, आर्थिक चणचणीमुळे एसटी महामंडळाचा हा प्रस्ताव

छत्रपती संभाजीराजेंच्या गौप्यस्फोटावर वडेट्टीवारांनी वेगळाच दावा केलाय. ओबीसी आरक्षणाला मराठा आरक्षण जोडा आणि वेगळा प्रवर्ग तयार करा, असं म्हटल्याचा दावा वड़ेट्टीवारांनी केलाय.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाकडून अनेकदा मांडण्यात आलीय. त्यातच छत्रपती संभाजीराजेंच्या बहुजन कल्याणमंत्री वडेट्टीवारांच्या गौप्यास्फोटामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live