VIDEO | 'काही जणांकडून जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल' - छत्रपती संभाजीराजे

साम टीव्ही
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020
  • 'मराठा समाजासाठी खांद्याला खांदा लावून काम करणार'
  • नेतृत्वाच्या मुद्यावर छ. संभाजीराजेंचं वक्तव्य
  • 'काही जणांकडून जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल'
  • 'मराठा आरक्षणासाठी आमदारांनी प्रयत्न करायला हवा'

बातमी मराठा आरक्षण परिषदेची. 'सर्व जण म्हणतात तुम्ही मराठा समाजाचं नेतृत्व करा, मात्र मी मराठा समाजासाठी खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे' असं म्हणत छत्रपती संभाजीराजेंनी नेतृत्वाच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलंय. मराठा समाजाला आरक्षणापासून का वंचित ठेवलं जातंय असा सवालही संभाजीराजेंनी केलाय.

नवी मुंबईत आज मराठा समाजाची मेगा बैठक पार पडली. या बैठकीवेळी बोलताना संभाजीराजेंनी मराठा समाजासाठी महाराष्ट्र पिंजून काढेल असं सांगितलं. काही जण जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल करतायेत. मराठा आरक्षणासाठी आमदारांनी प्रयत्न करायला हवेत असंही संभाजीराजेंनी म्हंटलंय. दरम्यान या बैठकीला खासदार उदयनराजेही उपस्थित राहणार होते. मात्र उदयनराजेंनी बैठकीकडे पाठ फिरवल्यानं मराठा समाजात नेतृत्वाची लढाई सुरू झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

UNCUT SambhajiRaje | 'काही जणांकडून जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल', पाहा, संभाजीराजेंचं मराठा आरक्षणासंदर्भात संपूर्ण भाषण

 


संबंधित बातम्या

Saam TV Live