मुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

ud
ud

मुंबई - हवामान विभागाने Meteorological Department दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई Mumbai तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यात काल रात्रीपासूनच पावसाला Rain सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मान्सूनचे Monsoon आगमन हवामान विभागाने जाहीर केले असून पुढील २ दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. The Chief Minister took Review of the heavy rain in Mumbai

मुंबईमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेतली. सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाकडून माहिती घेतली व मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

हे देखील पहा -

मुंबईत पंपींग स्टेशन्स कार्यरत राहतील व साचलेले पाणी लगेच उपसा कसा होईल ते तातडीने पाहावे तसेच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी  वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल तिथे पोलीस व इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करावेत अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com