राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 21 डिसेंबर 2019

नागपूर - अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांना  मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे .. राज्यातील शेतकऱ्यांचे  ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अटी आणि शर्ती घालण्यात आलेल्या नाही. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

नागपूर - अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांना  मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे .. राज्यातील शेतकऱ्यांचे  ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अटी आणि शर्ती घालण्यात आलेल्या नाही. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही जाऊन हेलपाटे घालावे लागणार नसल्याचे मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं  आहे . 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live