काय सांगता? चक्क मुख्यमंत्र्यांच्या वाहनाची घेतली झडती

साम टिव्ही ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर  तयार करण्यात आलेल्या सर्व तपासणी नाक्‍यांवर काटेकोर तपासणी सुरू आहे. 

बेळगाव:  बेळगाव लोकसभा (Lok Sabha) पोटनिवडणुकीच्या (By-election) पार्श्‍वभूमीवर मतदारसंघात तपासणी नाके बनवण्यात आले आहेत.  तयार करण्यात आलेल्या सर्व तपासणी नाक्‍यांवर काटेकोर तपासणी सुरू आहे. बुधवारी (ता. 7) ला हिरेबागेवाडीयेथील तपासणी नाक्‍यावर कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री (Chief Minister) बी. एस. येडीयुराप्पा B. S. Yediyurappa यांचे वाहनही तपासणीतून सुटले नाही. Chief Ministers vehicle Frisked in Karanataka Borders

बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे वाहन या तपासणी नाक्‍याजवळ येताच साहाय्यक निवडणूक अधिकारी शिवनगौडा पाटील यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या वाहनाची तपासणी केली. त्या वाहनातून कोणत्याही आक्षेपार्ह वस्तूची वाहतूक केली जात नाही, याची खात्री करून घेतली. मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनीही या तपासणी प्रक्रियेला संपूर्ण सहकार्य केले.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री येडीयुराप्पा (Yeddyurappa) मंगळवारी बेळगावात (Belgaon) दाखल झाले आहेत. बुधवारी त्यांनी रामदुर्ग, बैलहोंगल व सौंदत्ती तालुक्‍यात अंगडी यांच्यासाठी प्रचारसभा (Publicity) घेतल्या. प्रचार संपवून ते बेळगावकडे परत येत असताना त्यांच्या वाहनाची तपासणी (Checking) करण्यात आली. निवडणूक आचारसंहिता (Election Code of Conduct) लागू झाल्यापासून तपासणी नाक्‍यांवर चोवीस तास वाहनांची तपासणी केली जात आहे. आत्तापर्यंत या तपासणीत विविध ठिकाणी रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Edited by- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live