डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे निधन..

रुपेश पाटील
सोमवार, 29 मार्च 2021

डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे (वय -४१) यांचे मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवार २९ मार्च रोजी सकाळी १० वाजता निधन झाले 

पालघर: डहाणू (Dahanu) नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे (वय -४१) यांचे मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवार २९ मार्च रोजी सकाळी १० वाजता निधन झाले आहे. डहाणू नगर परिषद येथे दुसऱ्यांदा मुख्याधिकारी पदाचा पदभार ते सांभाळत होते.  त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. Chief Officer of Palghar Municipal Council Atul Pimple has passed away

कोरोना (Corona) काळात डहाणू (Dahanu) नगर परिषदेच्या क्षेत्रात त्यांनी चांगल्या पद्धतीने सर्व परिस्थिती हाताळली होती. पिंपळे हे चांगल्या कारभाराबरोबरच प्रशासनावर वचक निर्माण करणारे अधिकारी अशी त्यांची ओळख होती. २६ मार्च रोजी सकाळी अतुल पिंपळे त्यांच्या डहाणू मल्याण येथील घरात  बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना डहाणू येथील व्हेस्टकोस रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर मिरारोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात हलवून तिथे पिंपळे यांचे उपचार सुरु होते.

प्रकृती आणखीनच खालावल्याने तसेच डायलेसिस करण्यासाठी सोमवारी त्यांना हिंदूजा रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान आज सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. पालघर तालुक्यातील मासवण या त्यांच्या मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Edited By - Sanika Gade
 


संबंधित बातम्या

Saam TV Live