नागपूरात अपहरण करुन मुलाची हत्या; खंडणी स्वरुपात मागितलं होतं काकाचं शिर

संजय डाफ
शुक्रवार, 11 जून 2021

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील इंदीरा माता नगर भागातून राजकुमार पांडे, या मुलाचं काल पाच वाजता अपहरण करण्यात आलं.

नागपूरात (Nagpur Crime) १५ वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण करुन त्याची निर्घुन हत्या करण्यात आली आहे आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने खंडणी म्हणून मृतक मुलाच्या काकाचं मुंडकं कापून त्याचा फोटो व्हॉट्सअप वर पाठवण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यानं अपहरणाच्या दोन तासांच्या आत मुलाची हत्या करण्यात आली आहे. (A child has been abducted and murdered in Nagpur)

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील इंदीरा माता नगर भागातून राजकुमार पांडे, या मुलाचं काल पाच वाजता अपहरण करण्यात आलं.  क्रिकेट खेळायला जाऊ असं  सांगत मुलाचं अपहरण केलं आणि सायंकाळी सात वाजता त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपी सुरज कुमार साहू याला पोलिसांनी अटक केली आहे. 

हे देखील पाहा

मृतक मुलाच्या काकावर असलेल्या रागातून आरोपीने राज पांडे या मुलाचं अपहरण केलं आणि त्यानंतर आरोपीने घरी फोन करुन मृतकाच्या काकाचं मुंडकं कापून मोबाईलवर फोटो पाठवण्याची केली मागणी. त्यानंतर दोन तासांत मुलाची हत्या केली. आरोपी सुरज कुमार साहू याला एमआयडीसी पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरु आहे. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असल्याची  प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live