पर्यावरण संवर्धनासाठी मुलाचा पुढाकार; सीड बॉल बनवण्याचा उपक्रम..

विजय पाटील
शनिवार, 5 जून 2021

सांगलीच्या इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूल तर्फे तब्बल १६  हजार सीड बॉल  निसर्गाच्या कुशीत टाकण्यात आले आहेत. तर यंदा पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तब्बल पाच हजार सीड बॉल बनवण्यात आले. 

सांगली : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर आता नागरिकांना ऑक्सिजनचे महत्त्व पटू लागले आहे. वातावरणात नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीसाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन गरजेचे बनले आहे. सांगलीच्या इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूल तर्फे तब्बल १६  हजार सीड बॉल Seed ball निसर्गाच्या कुशीत टाकण्यात आले आहेत. तर यंदा पर्यावरण दिनाचे World Environment Day औचित्य साधून तब्बल पाच हजार सीड बॉल बनवण्यात आले आणि हे बॉल निसर्गाच्या सानिध्यात टाकले आहेत. मुलांनी पर्यावरणप्रेमींमध्ये आदर्श निर्माण केला आहे. Child initiative for environmental conservation

प्रेयसीवर अतिप्रसंग; फेसबुकवर व्हायरल केला व्हिडीओ !

पाच जूनला सर्वत्र पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने सामजिक बांधिलकी म्हणून सीड बॉल बनविण्याच्या उपक्रम राबविण्यात आला. माती, शेण आणि पाण्याचे मिश्रण केले, आणि चिखलाचे गोळे करून त्यात विविध फळ बिया आणि सावली देणाऱ्या झाडाच्या बिया रोवल्या. हाताने गोल आकार  सीड बॉल बनविले गेले. गेल्या चार दिवसांपासून मुक्तांगण प्ले स्कूलच्या आवारात हा उपक्रम घेण्यात आला. कोरोनामुळे स्कूल बंद आहेत, त्यामुळे काही पालकांनी एकत्रित हे सीड बॉल बनविले आहेत. 

दोन दिवसांपासून तालुक्यातील विविध डोंगरावर हे सीड बॉल फेकण्यात येत आहेत. चिंचोके, जांभूळ, पपई , फणस, बहावा, गुलमोहर, रानटी बाभूळ आदी बिया आणण्यात आल्या होत्या. लहान मुले, महिलां पालकांसह माजी विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सहभाग नोंदवत सीड बॉल बनविण्यासाठी उत्साहाने सहभागी घेतला.

मुलांनी  माती आणि शेण समप्रमाणात घेऊन एकजीव केले. त्यात विविध देशी झाडांच्या बिया घालून छोट्या बॉलसारखे गोळे तयार करण्यात आले. तर वाळलेले सीड बॉल निसर्ग भ्रमंती, ट्रेकींग आणि सहलीदरम्यान मुलांच्या मार्फत टाकण्यात येणार आहेत. हे बॉल फुटून बियांना अंकुर येईल आणि त्या रोपांचे झाडात रुपांतर होईल.

Edited By- Sanika Gade

 


संबंधित बातम्या

Saam TV Live