Video | नक्की पहा ! 'या' चिमुरड्याचं खुमासदार भाषण 

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 30 जानेवारी 2020

अखेरीस तो मी एवढे बोलून इथं थांबतो...इथं थांबतो...मी पुढल्या वर्षी पुन्हा येईन...पुन्हा येईन...पुन्हा येईन...भारतमाता की जय... असे म्हणताच सर्व विद्यार्थींनी टाळ्यांच्या कडकडाट केला. मिराजच्या भाषणाचे सध्या समाजमाध्यामंवर कौतुक होत आहे. 

 

 

 

 

सातारा : शाळकरी मुलांमध्येही देशप्रेम किती आेतप्राेत भरलेले असते याची झलक प्रजासत्ताकदिनी रायगड जिल्ह्यातील दूरशेत या छाेट्या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील छाेट्या मुलांनी दाखवून दिले आहे. 
एका विद्यार्थ्याने केलेले भाषण सध्या समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात गाजत आहे. त्याच्या बोबड्या भाषणातून सर्वांना एक नवी ऊर्मी, ऊर्जा मिळत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान त्याने भाषणाच्या अखेर मी पुन्हा येईन...पुन्हा येईन...पुन्हा येईन असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केलाच परंतु समाजमाध्यांमध्येही नेटकरींच्या भुवया उंचावल्या गेल्या.

 

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्‍यातील दूरशेत या गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन झाले. त्यानंतर शाळेतील प्रांगणात विद्यार्थ्यांची भाषणे झाली. बहुतांश विद्यार्थी विविध वेशभूषेत होते. प्रत्येक विद्यार्थी आपल्या भाषणातून सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत होता. यामध्ये मिराज काशिनाथ गावंड या इयत्ता दुसरीमधील विद्यार्थ्याचे भाषण कौतुकाचा विषय ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य थोर महापुरुषांविषयी मिराजने आपल्या भाषणातून त्यांची शौर्यगाथा उपस्थितांसमोर मांडली. मिराजचा भाषण करतानाचा उत्साह वाखण्यजोगा होता.

अवघ्या एका मिनिटाच्या भाषणात मिराज एखाद्या तरबेज वक्‍त्याप्रमाणे हावभाव करीत आहे. मिराज आपल्या भाषणात म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेऊन स्वराज्य निर्माण केले होते. आई म्हणते बाळ तो मोठा होता. पुढे मिराज सैनिकांच्या शौर्याविषयी भरभरून बोलत होता. अखेरीस तो मी एवढे बोलून इथं थांबतो...इथं थांबतो...मी पुढल्या वर्षी पुन्हा येईन...पुन्हा येईन...पुन्हा येईन...भारतमाता की जय... असे म्हणताच सर्व विद्यार्थींनी टाळ्यांच्या कडकडाट केला.

मिराजच्या भाषणाचे सध्या समाजमाध्यामंवर कौतुक होत आहे. तसेच मुलांच्या कला गुणांना प्रोत्साहित करणाऱ्या मुख्याध्यापक दत्तात्रय कोठेकर आणि केंद्र प्रमुख संजीव घरत यांच्याशी अनेकजण संपर्क साधत उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत.
 

WebTittle :: Chimpanzee speech


संबंधित बातम्या

Saam TV Live