भयंकर! हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगाचा थरकाप उडेल! लिफ्टमध्ये अडकून चिमुरड्याचा मृत्यू

साम टीव्ही
रविवार, 29 नोव्हेंबर 2020
  • लिफ्टने घेतला 5 वर्षीय चिमुकल्याचा बळी
  • मुंबईतल्या धारावीतील अंगाचा थरकाप उडवणारी घटना
  • लिफ्टचं सेफ्टी डोअर बंद झाल्याने चिमुकल्याचा घात
  • सावधान! पालकांनो तुमच्या पाल्याकडे लक्ष द्या..

ही बातमी आहे, चिमुरड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी. आपल्या पाल्याला एकट्याने बिल्डिंगमधील लिफ्ट वापरु देत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. लिफ्टमधून बाहेर येत असतानाच दरवाजात अडल्याने, जखमी होऊन ५ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धारावीत घडली. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या दुर्दैवी घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. 

पाहा या घटनेचा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ -

पालवाडी येथील कोझी शेल्डर बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर राहणारा, हुजेईफा शेख हा चिमुरडा. आपल्या दोन बहिणींसह बिल्डिंगच्या लिफ्टमधून घरी चालले होते. लिफ्ट चौथ्या मजल्यावर पोहचल्यानंतर त्याच्या दोन्ही बहिणी लिफ्टचे दोन्ही दरवाजे उघडून बाहेर गेल्या. त्यानंतर बाहेर जाणाऱ्या हुजेईफा लिफ्टच्या लोखंडी आणि लाकडी दरवाजात अडकला.

त्यानंतर क्षणार्धात लिफ्ट सुरू झाली. अन् लिफ्ट आणि बिल्डिंगच्या गॅपमध्ये हुजेईफा चिरडला गेला. आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पालकांनो लिफ्टमध्ये मुलांना एकटे सोडू नका आणि लिफ्टमनशिवाय लिफ्टचा वापर करू नका.


संबंधित बातम्या

Saam TV Live