भारताविरोधात चीन-पाकचे गळ्यात गळे, चीन-पाकच्या लढाऊ विमानांच्या गिधाड घिरट्या

साम टीव्ही
शनिवार, 26 सप्टेंबर 2020
  • भारताविरोधात चीन-पाकचे गळ्यात गळे
  • चीन-पाकच्या लढाऊ विमानांच्या गिधाड घिरट्या
  • चीन-पाक एकत्र आले तरी ठेचू, भारताचा निर्धार

आता बातमी चीन आणि पाकच्या युतीची. भारताला चीन आणि पाकिस्तान नेहमीच त्रास देतात. भारत या दोन्ही देशांना पुरून उरत असल्याने हे दोन्ही देश आता भारताविरोधात एकत्र आलेत. पण चीन आणि पाकिस्तान हातात हात घालत एकत्र आले तरी भारत त्यांना पुरून उरणारेय.

चीन आणि पाकच्या सीमांवर असे आवाज रात्रंदिवस सुरू आहेत. कारण, लडाख सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन आणि पाकिस्तानने एकत्र कुरापती सुरू केल्यायत. चीन आणि पाकची लढाऊ विमानं भारताच्या सीमांवर संयुक्तरित्या घिरट्या घालत आहेत. त्यामुळे भारताला स्वतंत्रपणे डिवचणारे चीन आणि पाकिस्तान आता भारताविरोधात एकत्र येतायत. एनकेन प्रकारे भारताला डिवचण्याचा हा संयुक्त धंदा चीन आणि पाकने सुरू केलाय. कारण

चीन-पाकच्या गिधाड घिरट्या
लडाख खोऱ्यावर चिनी विमानांच्या घिरट्या सुरू आहेत, त्याचप्रमाणे लडाखजवळ चिनी सैन्याच्या हालचाली रात्रंदिवस सुरू आहेत. आणि आता पाकव्याप्त काश्मिरच्या परिसरावरही पाकिस्तानची विमानं उड्डाणं करतायत. दौलत बेग ओल्डी परिसरावरही पाकिस्तानची विमानं घिरट्या घालतायत. त्याचप्रमाणे स्कार्दू एयरबेस, खारडुंगला पास आणि श्योक नदीवरही लढाऊ विमानं रात्रंदिवस फिरतायत. महत्त्वाचं म्हणजे लढाऊ विमानांच्या या घिरट्या पाक आणि चीन संयुक्तरित्या घालतायत.
याचाच अर्थ, एका बाजूला लडाख सीमेवर आणि दुसऱ्या बाजूला काश्मिरमधून भारताला डिवचण्याचे उद्योग चीन आणि पाकने सुरू केलेत. असं असलं तरी, चीन आणि पाकिस्तान हातात हात घालून चाल करून आले तरी, त्यांना एकत्र लोळवण्याचं सामर्थ्य भारताकडे असल्याचं वायुदलाने खंबीरपणे सांगितलंय. त्यासाठी वायुदलाची शक्ती वाढवण्याचं काम युद्धपातळीवर सुरूय. त्यामुळे, चिनी ड्रॅगन आणि पाकडे एकत्र आलेच, तरी त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी भारत सज्ज झालाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live