चीननं पाकिस्तानाला बनवला बळीचा बकरा, पाकिस्तानी लोकांवर करणार औषधांचा प्रयोग

साम टीव्ही
शनिवार, 9 मे 2020

 

  • चीननं पाकिस्तानाला बनवला बळीचा बकरा
  • पाकिस्तानी लोकांवर करणार औषधांचा प्रयोग
  • चाचणीसाठी कपटी चीननं आखला नवा डाव

कोरोनाविरोधातल्या लढ्यात चीननं आता पाकिस्तानला बळीचा बकरा बनवलाय. चीननं कोरोनावर लस शोधलीय. मात्र त्याचा पहिला प्रयोग पाकिस्तानातल्या नागरिकांवर होईल. काय आहे चीनचा कुटिल डाव, पाहा...

कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करतोय. चीननं देखील औषध तयार केलंय. मात्र या लसीचं परीक्षण करण्यासाठी चीननं कुटीलनिती वापरलीय. या लसींची चाचणी पाकिस्तानी जनतेवर केली जाणारंय. विशेष म्हणजे त्यासाठी चीनच्या 40 डॉक्टरांची टीम पाकिस्तानात दाखलही झालीय. पाकिस्तानी लोकांवर औषधांची चाचणी करण्याकरता दोन्ही देशांनी एक करार केलाय. पाकिस्तानातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या आमिर इकराम यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना पाकिस्तानात औषधांच्या चाचण्या सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलंय. याचाच अर्थ चीनला खूश करण्यासाठी इम्रान खान सरकारनं आपल्याच जनेतला प्रयोगासाठी उंदीर बनवलंय. 
 चीननं तयार केलेल्या औषधाला अनेक संस्थांनी मान्यता दिल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय. मात्र याच औषधांचे साईड इफेक्ट पाकिस्तानी लोकांना भोगावे लागील ही देखील दुसरी बाजू आहे. चिन्यांचा प्रयोग अयशस्वी ठरला तर पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात महामारी पसरू शकते. इतर आजारही बळावू शकतात. मात्र पाकिस्तानी सरकार चीननं केलेल्या उपकाराच्या ओझ्याखाली इतकं दबलं गेलंय की त्यांना स्वत:च्या लोकांची जराही परवा उरलेली नाही. ज्या चीनमधून कोरोना वाऱ्यासारखा जगभर पसरला तोच चीन आता औषधांच्या चाचणीसाठीही पाकचा वापर करतोय. चिन्यांची ही कुटील निती इम्रान खान सरकारच्या लक्षात येऊनही त्याला मान्यता दिली जात असेल तर पाकिस्तानी जनतेसाठी ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live