चीननेच कोरोनाचे नमुने नष्ट केले, आणि दिली लपवाछपवीची कबुली

साम टीव्ही
रविवार, 17 मे 2020

चीननेच कोरोनाचे नमुने नष्ट केले
स्वतः चीनने दिली लपवाछपवीची कबुली
अमेरिकेच्या दाव्यांवर शिक्कामोर्तब

कोरोनाचे नमुने नष्ट केल्याचं चीनने मान्य केलंय. त्यामुळे अर्थातच अमेरिकेने आजवर केलेल्या दाव्यांवर शिक्कामोर्तब झालंय. नेमकं काय म्हटलंय चीनने, पाहुयात

कोरोनाने सगळ्याच बलाढ्य राष्ट्रांना हतबल केलं. आणि त्यानंतर सगळ्यांच्याच नजरा चीनकडे वळल्या. चीन काहीतरी लपवतंय हा संशय होताच. अमेरिकेनेही वारंवार हे दावे केले. आणि आता खुद्ध चीनने आपण कोरोनाचे नमुने नष्ट केल्याचं मान्य केलंय. चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ्य आयोगाचे निरीक्षक यू डेंगफेंग यांनीच ही कबुली दिलीय.

 चीनने काय कबुली दिली?

3 जानेवारीला चीन सरकारने अनधिकृत लॅबमधून कोरोना व्हायरसचे सॅम्पल नष्ट करण्याचे आदेश दिले. मात्र यात लपवाछपवीचा हेतू नव्हता. बायोलॉजिकल सुरक्षा आणि संभाव्य अपघात टाळता यावा यासाठी हा व्हायरस नष्ट करण्यात आला. 

अशी माहिती चीनी अधिकाऱ्यांनी दिलीय. मात्र या कबुलीआडून चीन काय साध्य करु पाहतंय. हे सुद्धा समजून घ्यायला हवंय..

कोरोना हे जर चीनचं कारस्थान असेल, तर आता ते फार काळ लपून राहणार नाहीये. व्हायरस नष्ट केल्याची कबुली चीनने दिलीच आहे. कदाचित दबाव वाढला तर चीन आणखी काही धक्कादायक खुलासेही येत्या काळात करु शकेल आणि असं झालं, तर त्यासाठी चीनला माफ करता येणार नाही...


संबंधित बातम्या

Saam TV Live