जगाला संकटात ढकलणारा चीन भीकेला लागण्याची चिन्हं

साम टीव्ही
सोमवार, 8 जून 2020
  • कोरोनाच्या संकटात चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा सुरूंग
  • जगाला संकटात ढकलणारा चीन भीकेला लागण्याची चिन्हं
  • चीनसमोर औद्योगिक, आर्थिक मंदीसह बेरोजगारीचा मोठा डोंगर

जगाला संकटात ढकलणाऱ्या चीनची अवस्था मात्र अत्यंत बिकट होत चाललीय. आर्थिक, सामाजिक अशा सर्वच पातळ्यांवर चीन मोठ्या संकटात सापडलाय. 'करावे तसे भरावे' या म्हणीचा प्रत्यय चीनला कसा घ्यावा लागलाय.

जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून चीनवरच्या संशयाची सुई टोकदार झालीय. जगभरात बहुतांश देशांत लॉकडाऊन करावं लागल्याने अनेक देशांची आर्थिक घडी विस्कटून गेलीय. भारताच्या अर्थव्यवस्थेसमोरही मोठी संकटं उभी राहिलीयत. मात्र जिथं कोरोनानं जन्म घेतला त्या चीनची अवस्था मात्र प्रचंड हलाखीची झालीय. सामाजिक, आर्थिक पातळ्यांवर चीनची मोठी होरपळ झालीय.

चीन भीकेला लागण्याची चिन्ह
अमेरिकेतील चिनी कंपन्या बंद करण्याचा कायदा अमेरिकन सिनेटने मंजूर केलाय. चीनमध्ये निर्मिती होणाऱ्या आय फोननेही भारतात कंपनी सुरू करण्याची घोषणा केलीय. चीनमध्ये अनेक कंपन्या सुरू झाल्या असल्या तरी मागणी नसल्याने त्या कंपन्याही माना टाकू लागल्यायत. त्यामुळे कोट्यवधी चिनी युवक बेरोजगार झालेत. त्याचसोबत चीनमध्ये स्टीलची आयात सर्वात जास्त होते मात्र ऑस्ट्रेलियाने चीनला स्टील देण्यास नकार दिलाय. परिणामी चीनमधल्या अनेक कंपन्या बंद आहेत. त्यामुळे 1976 सालानंतर पहिल्यांदाच ची चीनची अर्थव्यवस्था 6.8 टक्क्यांनी घसरलीय.

इतकंच नाही तर, आर्थिक डबघाईस जाणाऱ्या चीनमध्ये सामाजिक आंदोलनांचा वणवा पेटलाय. त्याचाही सामना चीनला करावा लागतोय. जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना, त्याबाबत कोणतीही मदत न करण्याची चीनची भूमिका आता लपून राहिलेली नाही. त्यामुळे चीनची आर्थिक दिवाळखोरी ही करावे तसे भरावे या म्हणीचा प्रत्यय देणारी आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live