'20 वर्षात चीननं बनवले 4 घातक व्हायरस'

साम टीव्ही
बुधवार, 13 मे 2020
  • '20 वर्षात चीननं बनवले 4 घातक व्हायरस'
  • घातक व्हायरस पसरवणाऱ्या चीनवर बंदी घाला 
  • अमेरिकेच्या सीनेटमध्ये महत्त्वाचा प्रस्ताव

कोरोनाच्या प्रसारावरून अमेरिकेनं चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. आजवरचे घातक व्हायरस चीननेच तयार केले असा आरोप चीननं केलाय. तसच चीनवर बंदी घालण्याबाबतचा प्रस्तावही सिनेटमध्ये ठेवण्यात आलाय. 
कोरोना व्हायरसमुळे चीन आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. अमेरिका सातत्यानं चीनच्या भूमिकेवर प्रश्न विचारतीय. आता तर अमेरिकेच्या सिनेटमध्ये चीनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. रिपब्लिकन खासदारांनी असा कायदा तयार केला आहे, ज्यामुळे ट्रम्प यांना चीनवर बंदी घालण्याची ताकद मिळेल. या
प्रस्तावित कायद्याला कोविड-19 अकाउंटबिलिटी बिल असं नाव देण्यात आलंय. प्रस्तावित कायद्यानुसार, अध्यक्ष ट्रम्प यांनी संसदेला 60 दिवसांच्या आत चीननं संक्रमणाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे की नाही हे सांगावं लागणारय. तसच चीनच्या भूमिकेत संशय आढळल्यास यासंदर्भात संयुक्त राष्ट्र किंवा WHOस्वत: चा तपास सुरू करता येणार आहे. 
 दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांच्यानंतर 
आता अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनीदेखील चीनवर निशाणा साधलाय. चीननं गेल्या 20 वर्षांत जगाला 5 मोठी संकटं दिली आहेत. या संकटांमध्ये सार्स, एव्हिएन फ्लू, स्वाइन फ्लू आणि कोरोना व्हायरस या 4 व्हायरसची चीनमधूनच उत्पत्ती झाली. आता हे जैविक हल्ले थांबवण्यासाठी चीनला उत्तर द्यावंच लागेल असं त्यांनी म्हंटलंय. अमेरिकाचा हा आक्रमक पवित्रा म्हणजे चीनसाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. ज्या चीननं साऱ्या जगाला कोरोना दिला. त्या चीनला आता सर्वांनी मिळून धडा शिकवायलाच हवा. 


संबंधित बातम्या

Saam TV Live