चीननं जगभरातील देशांना केलंय कर्जबाजारी

चीननं जगभरातील देशांना केलंय कर्जबाजारी

जगातील छोट्या छोट्या देशांना कर्ज द्यायचं, त्यांना कर्जबाजारी करायचं आणि नंतर त्या देशांची महत्त्वाची मालमत्ता हडप करायची. हे सूत्र चीनचं अनेक वर्षांपासून आहे. छोट्या देशांना विकासकामांचं आमिष दाखवून चीन कसा फसवतोय.

कोरोनामुळे चीनबाबत जगभरात संतापाची लाट असतानाच, चीननं अनेक वर्षांपासून केलेला प्रत्येक कावेबाजपणा आता उघड होऊ लागलाय. चीननं जगभरातील अनेक देशांना कर्जबाजारी केल्याचं समोर आलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे, कर्जाच्या मोबदल्यात अनेक देशांची मालमत्ताही चीननं हडपल्याचे आकडे समोर आलेयत.

  • कोणत्या देशांवर चिनी कर्जाचं ओझं?
  • एंगोला- 1.87 लाख कोटी
  • इथियोपिया- 1.01 लाख कोटी
  • जाम्बिया- 55 हजार कोटी
  • कांगो- 55 हजार कोटी
  • सुदान- 48 हजार कोटी


हे आकडे पाहता छोट्या-छोट्या देशांना विकासकामांचं गाजर दाखवत कर्जबाजारी करण्याचं धोरण चीननं गेल्या काही वर्षांत अवलंबलंय.

कसा आहे चीनचा मालमत्ता हडपण्याचा फण्डा?
श्रीलंकेला कर्जबाजारी करून नंतर चीननं हंबनटोटा बंदर ताब्यात घेतल्याचं उदाहरण जगासमोर आहेच. युरोप-आशिया-आफ्रिका खंडांना रस्ते-जलवाहतुकीनं जोडण्याचा प्रकल्प चीननं हाती घेतलाय. त्या प्रकल्पाला पाठिंबा देणारे छोटे देश चीनच्या ओझ्याखाली दबून गेलेयत. पाकिस्तानवरही चीनचं अब्जावधी रुपयांचं कर्ज आहे.

याचाच अर्थ असा की, चीन इतर देशांच्या मालमत्तेवर टपून बसलाय. इतर देशांना विकासकामांचं गाजर दाखवायचं, त्यांना भरमसाठ कर्जाचा आवळा द्यायचा आणि नंतर त्या देशांच्या मालमत्तेचा कोहळा गिळून टाकायचा ही चीनची मोडस ऑपरेंडी राहिलीय. जगाला कोरोनाच्या संकटात ढकलल्यामुळे चीनचा कपटीपणा दिसला आहेच. पण आता चीनचं संधीसाधू बगळ्याचं रुपही जगासमोर उघडं पडलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com