तैवाननंतर चीनची भारताला धमकी, वाचा कोण असेल भारताकडून...?

साम टीव्ही
सोमवार, 21 सप्टेंबर 2020
  • तैवाननंतर चीनची भारताला धमकी
  • ग्लोबल टाईम्समध्ये धमकीचा अग्रलेख
  • भारत-चीन युद्ध झालं तर आग्नेय आशिया भारतासोबतच!

चीननं तैवानला धमकी देऊन 24 तास उलटत नाहीत तोच भारतालाही धमकी दिलीय. चिनी सरकारचं मुखपत्रं असलेल्या ग्लोबल टाईम्समध्ये भारताला धमकी देणारा अग्रलेख प्रसिद्ध झालाय.

तैवानला धमकी देऊन 24 तास उलटत नाहीत तोच कपटी चीननं भारताला धमकी दिलीय. चिनी सरकारचं मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ग्लोबल टाईम्समधून संपादकीय लेखातनं भारतीय सैन्याला चिथावण्यात आलंय. भारतीय सैन्याला धडा शिकवू, अशी चिथावणीखोर भाषा अग्रलेखातून वापरण्यात आलीय़. चीनच्या युद्धखोरीमुळे आग्नेय आशियावर युद्धाचे ढग जमलेत.

  • चिनच्या युद्धखोरीमुळे तैवान आणि भारताला अमेरिकेनं खुलं समर्थन देऊ केलंय.
  • युद्ध झालं तर व्हिएतनाम तटस्थ राहिल तर..
  • फिलीपाईन्स अमेरिकेच्या इशाऱ्यावरनं भारताला साथ देईल
  • तैवानही भारताच्याच बाजूनं असेल
  • इंडोनेशिया कुणाच्या बाजूनं झुकेल यासंबंधी साशंकता आहे.
  • भारतीय भूभागावर चीनचा डोळा आहे. दक्षिण चीनी समुद्रावरही कब्जा करण्याचा चीनचा मानस आहे. त्यामुळेच चिथावणीखोर, युद्धखोरीची भाषा चीन करतोय. अर्थात चीनच्या युद्धखोरीमुळे भारतासह आग्नेय आशियातील अनेक देश त्रस्त आहेत. चीननं काही आगळीक केलीच तर हे सगळे देश मिळून चीनला धडा शिकवतील, हे नक्की.


संबंधित बातम्या

Saam TV Live