कुरापतखोर चीन आता अंतराळातून वार करण्याच्या तयारीत, चीन बनवतंय रोबोट आणि सॅटेलाईट जॅमर

साम टीव्ही
शनिवार, 5 सप्टेंबर 2020
  • कुरापतखोर चिनी ड्रॅगनचा नवा उद्योग
  • चीन बनवतंय रोबोट आणि सॅटेलाईट जॅमर
  • इतर देशांचे उपग्रह पाडण्याचा चीनचा कट

कुरापत खोर चीन आता अंतराळातून हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी अंतराळात सॅटेलाईट आणि रोबोट सोडण्याची तयारी चीनने केलीय. कसं आहे चिनी ड्रॅगनचं सॅटेलाईट वॉर पाहूयात.

चीन भारतासह अनेक देशांना त्रास देतोय. व्यापारी वर्चस्वासाठी चीन वारंवार कुरापती करतोय. सीमाभागात सैन्याची कुमक वाढवण, भारताच्या हद्दीत घुसखोरी करणं असे उद्योग करणाऱ्या चीननं आता युद्धासाठी नवी पद्धत अवलंबलीय. चीन युद्धासाठी आता रोबोट आणि सॅटेलाईट जॅमर बनवण्याची तयारी सुरू केलीय. ज्याच्या माध्यमातून शत्रू राष्ट्राचे उपग्रह पाडण्याचा चीनचा डाव आहे. खुद्द अमेरिकेनेच तसा इशारा दिलाय.

कसं आहे चीनचं सॅटेलाईट वॉर?
इतर देशांचे भूभाग बळकावण्यासाठी चीन वारंवार घुसखोरी करतो. त्यातच आता चीनने अंतराळातून हल्ला करण्याचा नवा कट आखलाय. चीन अंतराळात सॅटेलाईट आणि रोबोट सोडण्याची तयारी करू लागलाय. हेच सॅटेलाईट आणि रोबोट शत्रू राष्ट्राचे उपग्रह पाडण्याचं काम करणार आहेत. त्यामुळे भारतासोबत इतर देशांच्या दूरसंचार, टेलिव्हिजन आणि अंतराळ प्रकल्पांवर परिणाम होऊ शकतो.

जगावर आर्थिक वर्चस्व मिळवण्याचा आणि इतर देशांचे भूभाग बळकावण्याचा चीनचा हव्यास लपून राहिलेला नाही. त्यासाठी चीन कायमच उचापती करत असतो. त्यातच आता चीननं आता सॅटेलाईट वॉरचा कट आखलाय. अर्थात, अमेरिकेने इशारा दिल्यानंतर भारताची इस्रो आणि डीआरडीओही सॅटेलाईट वॉरसाठी सज्ज झालीय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live