चीनच्या निशाण्यावर अमेरिकेसोबत आता भारतही? हल्ला करण्यासाठी चीनचं टार्गेट दिल्ली?

साम टीव्ही
शनिवार, 8 ऑगस्ट 2020
  • हल्ला करण्यासाठी चीनचं टार्गेट दिल्ली?
  • दिल्लीवर हल्ला करू शकणाऱ्या अण्वस्त्राची चाचणी
  • चीनच्या निशाण्यावर अमेरिकेसोबत आता भारतही?

चीनची खुमखुमी अजूनही थांबत नाहीये. कोरोनाचं विष जगभर पेरून चीननं आता भारताशी आणखी एक आगळीक केलीय. काय आहे चीनचा नवा डाव? पाहा-

जगभरात कोरोनाचं विष पेरणाऱ्या चीनची खुमखुमी काही थांबायचं नाव घेईना. भारत, अमेरिकेसह अनेक देशांशी पंगा घेणाऱ्या चीनने आणखी एक आगळीक केलीय. चीनने आता डीएफ-26 आणि डीएफ-16 या मिसाईलची चाचणी केलीय. त्यामुळे कोरोनाच्या संकटातही चीनची युद्धखोरी जगाला बघायला मिळतेय.

कसं आहे डीएफ-26 आणि डीएफ-16 मिसाईल?

डीएफ-26 आणि डीएफ-16 मिसाईलची चाचणी चीननं केलीय, या दोन्ही मिसाईलची क्षमता 4000 किलोमीटर इतकी आहे. या दोन्ही मिसाईलच्या कक्षेत संपूर्ण भारतासह प्रशांत महासगर आणि त्यातला गुआम नेव्ही बेसही येतो. या मिसाईल्सच्या माध्यामातून 1200 ते 1800 किलोपर्यंतचं न्यूक्लिअर स्फोटक वाहून नेता येऊ शकतं.

याचाच अर्थ हा होतो की, कोरोनाचं संकट जगाच्या डोक्यावर देऊनही चीनचं कपट सुरूच आहे, त्यामुळे, जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन चीनचं कारस्थान मोडायला हवं, आणि जमीन, जारपेठांसह इतर देशांवर ताबा मिळवायची चीन हौस कायमची जिरवायला हवी.


संबंधित बातम्या

Saam TV Live