कोरोनावर लस शोधण्यात चीन घालतोय खोडा

साम टीव्ही
मंगळवार, 5 मे 2020
  • कोरोनावर लस शोधण्यात चीन घालतोय खोडा
  • 5 देशांच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाने खळबळ
  • कोरोनाच्या संकटात चीनचं आणखी एक कपट उघड

आता बातमी चीनच्या कपटीपणाची... कोरोनावर लस शोधण्यात संपूर्ण जग गुंतलेलं असताना चीन मात्र कोणतंही सहकार्य करण्यास तयार नाही. चीननं कशी केलीय लपवाछपवी.

जगभरात कोरोनाविरोधात लढाई सुरूय. कोरोनाग्रस्तांवर उपचार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना अशा सर्वच पातळ्यांवर जगभरात प्रयत्न सुरूयत. त्याचसोबत कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरूयत. मात्र याच लस बनवण्याच्या संशोधनाला खोडा घालण्याचं काम चीननं सुरू केल्याचं कळतंय. तसा अहवालच 5 देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलाय.

चीनचं कपट उघड करणारा अहवाल काय सांगतो?
अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या गुप्तचर यंत्रणांनी चीन लस बनवण्यात अडथळे निर्माण करत असल्याचा दावा केलाय. जगभरातील शास्त्रज्ञांना कोरोनाच्या विषाणूचे नमुने पाठवण्यास चीनने नकार दिलाय. त्याचप्रमाणे चीनमध्ये सापडलेल्या पहिल्या कोरोनाग्रस्ताचे रिपोर्ट आणि त्यासंबंधीची माहिती देण्यासही चीनकडून टाळाटाळ केली जातेय. त्यामुळे कोरोनावर लस विकसित करण्याला गती मिळत नाहीय.


संबंधित बातम्या

Saam TV Live