VIDEO | चीनचा डोळा आता भारताच्या सॅटेलाईटवर, आता आकाशातून युद्ध पुकारण्याच्या हालचाली

साम टीव्ही
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020
  • कुरापतखोर चीनचं आता स्काय वॉर
  • चीनचा डोळा आता भारताच्या सॅटेलाईटवर
  • भारताच्या सॅटेलाईट मोहिमांचं यश चीनला खुपलं

भारताच्या सीमांवर डोळा ठेवून असणारा चीन आता स्काय वॉर करण्याच्या तयारीत आहे. भारताच्या हद्दीत घुसण्याचे वारंवार केलेले प्रयत्न हाणून पाडल्याने चीन आता आकाशातून युद्ध पुकारण्याच्या हालचाली करतंय. आणि चीनच्या रडारवर आहेत भारताचे सॅटेलाईट. त्याचं कारणही तसंच आहे.

चीनचं आता स्काय वॉर

भारताने 27 मार्च 2019 रोजी अँटी-सॅटेलाइट क्षेपणास्त्र अर्थात A-Sat ची चाचणी केली. ज्यातून भारताला शत्रूराष्ट्राचे घातक उपग्रह पाडण्याचं कायनेटिक किल सामर्थ्य मिळालं. हेच भारताचं मिशन सॅटेलाईट आता चीनच्या डोळ्यांत खुपू लागलंय. म्हणूनच चीनने आता काऊंटर-स्पेस टेक्निकची तयारी केलीय. ज्याच्या माध्यमातून चीन जमिनीवरून जियोसिंक्रोनस ऑर्बिट (GEO) मध्ये स्पेस सिस्टमला नादुरूस्त करू शकतं. डायरेक्ट अॅसेट कायनेटिक किल आणि जॅमरच्या मदतीने चीन सायबर हल्ले करू शकतं.

याचाच अर्थ असा की, भारताला जमिनीवरून आणि आकाशातून त्रास देणारा चीन आता स्पेस वॉर करण्याच्या तयारीत आहे. असं असलं तरी इस्रोनं मात्र चीनच्या स्काय वॉरला तोंड देण्यासाठी भारतीय सॅटेलाईट यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असल्याची माहिती दिलीय. भारतीय सॅटेलाईट यंत्रणा अत्याधुनिक असल्याने चिनी हल्ल्याचा काहीही परिणाम होणार नसल्याचंही इस्रोनं स्पष्ट केलंय. त्यामुळे, चीनच्या स्कायवॉरला तोंड देण्यासाठी भारतही शतपटीनं सज्ज झालाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live