जगासमोर कोरोनाचं संकट, चीन-अमेरिकेची मात्र आदळआपट, आता अमेरिकेचा आणखी एक आरोप

साम टीव्ही
शनिवार, 16 मे 2020

जगासमोर कोरोनाचं संकट, चीन-अमेरिकेची मात्र आदळआपट
चीनच्या समुद्री हद्दीत अमेरिकेनं शिरकाव केल्याचा आरोप
अमेरिकन युद्धनौका हुसकावल्याचा चीनचा दावा

 

संपूर्ण जग कोरोनाशी लढण्यात गुंतलेलं असताना चीन आणि अमेरिकेची युद्धखोरी काही थांबायचं नाव घेत नाहीये... पाहा... नेमकं काय झालंय

जगभरात कोरोनाविरोधात युद्ध सुरू असताना चीनच्या हद्दीत मात्र असं चित्र निर्माण झालंय. संपूर्ण जग कोरोनामुळे जेरीस आलेलं असताना तिकडे चीन आणि अमेरिकेतही जोरात घमासान सुरूय. चीनच्या हद्दीत अमेरिकन युद्धनौकांनी घुसखोरी केल्याचा आणि त्यांच्या युद्धनौकांना हुसकावून लावल्याचा दावा चीनने केलाय. चीनच्या म्हणण्यानुसार दक्षिण चीनच्या हद्दीत अमेरिकन युद्धनौकांनी घुसखोरी केली होती मात्र, चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीनं या युद्धनौकांना हुसकावून लावल्याचा दावा केला जातोय.

मुळात, चीनमध्येही कोरोनानं अक्षरश: थैमान घातलंय. महासत्ता असलेल्या अमेरिकेचं तर कोरोनामुळे कंबरडं मोडलंय. असं असताना संपूर्ण जगही कोरोनाशी लढण्यात गुंतलंय. मात्र चीन आणि अमेरिकेचा दुश्मनीचा कीडा काही वळवळायचा थांबेना.


संबंधित बातम्या

Saam TV Live