चीनची खुमखुमी कायम, अरुणाचलजवळ वसवली तीन गावं

साम टीव्ही
सोमवार, 7 डिसेंबर 2020
  • चीनची खुमखुमी कायम
  • अरुणाचलजवळ वसवली तीन गावं
  • उपग्रहाने टिपलेल्या फोटोंतून खुलासा

भारताच्या अरूणाचल प्रदेशाजवळील सीमेवर चीनने पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न चालवलाय. यावेळी सैनिकी घुसखोरी न करता चीनने घुसखोरीचा वेगळाच मार्ग अवलंबलाय. 

भारताशी चर्चेचं नाटक कायम ठेवत चीनने सीमेवर मात्र आपल्या कारवाया सुरूच ठेवल्यात. चीनने पश्चिम अरुणाचल प्रदेशमध्ये भारत, चीन आणि भूतानच्या सीमेजवळ तीन गावं वसवलीएत. उपग्रहाद्वारे टिपलेल्या छायाचित्रातून ही बाब उघड झालीय.
ज्या ठिकाणी चीनने ही तीन गावं वसवलीएत, तो भाग बुमलापासून सुमारे 5 किलोमीटर दूर आहे. चीनने या भागात केलेलं नवं बांधकाम हे अरुणाचल प्रदेशलगतच्या भागावर आपला दावा मजबूत करण्याच्या चिनी रणनीतीचा एक भाग आहे. हान चीनी आणि तिबेटमधील कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांची वस्ती निर्माण करुन आपला क्षेत्रीय दावा मजबूत करण्याच्या धोरणावर चीन काम करतोय. 

यापुर्वीही भूतानच्या ताब्यातील भागामध्ये चीनने काही गावं वसवली होती. हा परिसर डोकलामपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आहे. ही बाब पाहता चीनने चहूबाजूने भारताला घेरत भारत-चीन सीमावादाची गुंतागुंत वाढवण्याचा डाव टाकलाय.त्यामुळे भारताला आता अधिक सावधगिरीने पावलं टाकावी लागणार आहेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live