भारतला टक्कर देण्यासाठी चीनची नवी रणनीती, पाहा चीनचा 'हा' घातक डाव

साम टीव्ही
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020
  • माघार घेण्यास तयार नाही चीन 
  • पँगाँग, हॉट स्प्रिंग आणि देपसांगमध्ये कुमक वाढवली
  • भारतला टक्कर देण्यासाठी चीनची नवी रणनीती

भारतासोबत शांतता चर्चा सुरू असतानाच चीनने एक घातक डाव टाकलाय. सीमेवर भारताविरोधात व्यापक युद्धमोहिम छेडण्याची तयारी चीनने सुरू केलीय.

पाहा व्हिडिओ -

एकिकडे सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतासोबत चर्चेचं नाटक करत तिकडे सीमेवर मात्र चीनने आपली ताकद वाढवायला सुरूवात केलीय. 
पँगाँग, हॉट स्प्रिंग आणि देपसांगमध्ये चिनी सैन्य अजिबात मागे हटायला तयार नाहीए. 

स्टार्टफोर या जागतिक स्तरावरील गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार डोकलामनंतर चीनने आपल्या सीमेवरील सैन्य तळावरील कुमक वाढवलीय. याशिवाय प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने 13 नवे सैनिकी तळ उभारायला सुरूवात केलीय. यामध्ये तीन एअरबेस, 5 एअर डिफेन्स पोझिशन्स आणि पाच हेलिपोर्टचा समावेश आहे. या सैन्य तळाच्या उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचाही या रिपोर्टमध्ये समावेश आहे. या 13 सैनिकी तळाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर भारताविरोधात व्यापक युद्ध मोहिम छेडण्याचा चीनचा इरादा आहे. 

सध्या ज्या परिसरात तणाव निर्माण झालाय तो परिसर डोंगराळ असल्याने प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी दोन्ही देशांचा हवाई हल्ल्यावर भर असेल. ही बाब लक्षात घेत भारताची क्षेपणास्त्रं आणि लढाऊ विमानं हवेतच टिपण्यासाठी एयर डिफेंन्स यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर चीनचा भर आहे. त्यामुळे भारताला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live