चिनी ड्रॅगनचा खतरनाक प्लान, सैन्यासाठी चीन तयार करतोय नेटवर्क

साम टीव्ही
शनिवार, 12 सप्टेंबर 2020
  • चिनी ड्रॅगनचा खतरनाक प्लान
  • बेल्ट अँड रोडच्या आडून कुरापती
  • सैन्यासाठी चीन तयार करतोय नेटवर्क
     

चीनने "रणनीतिक स्ट्रॉन्ग साइट्स" च्या नावाने बहुउद्देशीय पायाभूत रचनेसाठी एक मॉडेल बनवलंय. एका रिपोर्टनुसार चीन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या काही प्रकल्पांना शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करण्याची शक्यता आहे. याचा वापर चीन व्यावसायिक आणि लष्करी उद्देशासाठी करु शकतोय.

काय आहे चीनचा हेतू? 

याद्वारे चीन संरक्षणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करु शकेल... बाइडू उपग्रहाच्या नेटवर्कचा वापर निर्यात, बेल्ट अँड रोड देशांशी युद्ध अभ्यास शस्त्रांच्या विक्रीसाठीही करु शकेल.  

पाकिस्तान श्रीलंका, कंबोडिया आणि म्यानमार सहीत अन्य देशांमध्ये चीनने "रणनीतिक स्ट्रॉन्ग साइट्स"चं निर्माण सुरु केलंय. चीनला एकप्रकारे या राष्ट्रांची आर्थिक निर्भरता वाढवायची आहे. तर दुसरीकडे पश्चिमेकडील राष्ट्रांवरील निर्भरता कमी करायची आहे. चीन बाइडू उपग्रहाच्या माध्यमातून देशांना जोडण्याचा प्रयत्नही करतोय. कुरापतखोर आणि कपटी चीनने सुरु केलेले हे प्रयत्न चिंतेत टाकणारे आहेत. आणि जगाला सतर्क करणारे सुद्धा आहेत.. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live