चीननं गिळलं भारतातील मोबाईल मार्केट, चिनी मोबाईलचा भारतीय बाजारात 66 टक्के ताबा

साम टीव्ही
बुधवार, 6 मे 2020

चिनी मोबाईलचा भारतीय बाजारात 66 टक्के ताबा
भारतासह इतर देशांच्या मोबाईलपेक्षा चिनी मोबाईलचा दबदबा
चिनी मोबाईलची विक्री भारतात 108 टक्क्यांनी वाढली

तुम्ही मोबाईल वापरत असाल तर ही बातमी आवर्जून बघा. कारण भारताचं मोबाईल मार्केट चीननं कसं ताब्यात घेतलंय? हे पाहून तुम्हीही चक्रावून जाल

 आपल्या स्वार्थी आणि अप्पलपोट्या व्यापार धोरणामुळे चीनने जगभरातील बाजारपेठांवर ताबा मिळवलाय. इतर देशांतील उत्पादनांचा गळा घोटून चीननं जगभरातील बाजारात दबदबा निर्माण केलाय. मोबाईलविक्रीतही चीनचा हात कुणी धरू शकणार नाही अशी अवस्था निर्माण झालीय. कोरोनाच्या संकटाआधी भारतात चिनी मोबाईलची विक्री भारतात वेगाने वाढलीय.

 भारतीय मोबाईल बाजारात चीनचं साम्राज्य
भारतात चिनी मोबाईलची विक्री तब्बल 108 टक्क्यांनी वाढली. ती इतकी वाढली की भारतीय मोबाईल कंपन्यांचा टॉप 5 मध्येही समावेश नाही. याचाच अर्थ असा की भारतीय मोबाईल बाजारावर चिनी मोबाईल कंपन्यांचा तब्बल 66 टक्के ताबा आहे. स्वस्त मोबाईलचं आमिष दाखवत चीनच्या कंपन्यांनी हा ताबा मिळवलाय.
मोबाईल असो नाहीतर आणखी कोणत्याही वस्तू... चीननं भारतात जिथं संधी मिळेल तिथं हातपाय पसरलेत. त्यामुळे मोबाईलसह इतर वस्तू बनवणाऱ्या भारतीय कंपन्या अक्षरश: देशोधडीला लागल्यायत. अर्थात आता कोरोनाचं संकट आल्यामुळे सगळेच बाजार ठप्प आहेत. आणि कोरोनाच्या कटामागे चीनचा हात असल्याचा संशय जगभरात बळावतोय. त्यामुळे चिनी वस्तू वापरायच्या का याचा विचार आपण करायलाच हवा.


संबंधित बातम्या

Saam TV Live