Saam_Campaign |  भारतात चिनी वस्तूंना कसं रोखायचं? चीनच्या व्पापारी आक्रमणाने भारतीय उद्योगांचा कोंडमारा

साम टीव्ही
गुरुवार, 7 मे 2020

भारतीय उद्योगांनाही चिनी ड्रॅगनचा विळखा
चीनच्या व्पापारी आक्रमणाने भारतीय उद्योगांचा कोंडमारा
मेड इन चायनाला मेड इन इंडियाचा दणका  द्यायलाच हवा

अमेरिकेला धक्का देण्यासाठी चीननं नेहमीच आक्रमक व्यापार केलाय... मात्र असं करताना भारतासह अनेक देशांच्या उद्योगांना देशोधडीला लावलंय. नेमकं काय केलंय चीननं? तुम्हीच पाहा...

जगाच्या बाजारपेठेवर डोळा ठेऊन असलेल्या चीनची दादागिरी भारतीय बाजारपेठांवरही आहे. म्हणून तर भारतात प्रत्येकाच्या घरात एकतरी चिनी वस्तू असतेच. चीननं अत्यंत काटेकोर नियोजन करून भारतीयांच्या जगण्यात चिनी वस्तू घुसवल्या आहेत. मुळात जागतिक महासत्ता बनण्याच्या हव्यासामुळे चीन भारतासह इतर देशांत हात पाय पसरतंय. हेच पाहून 2018 साली भारत सरकारच्या समितीनं काही गंभीर निरीक्षणं आणि सूचना सादर केल्यायत.

 भारतात चिनी वस्तूंना कसं रोखायचं?

निरीक्षण- चीन भारतात स्वस्त वस्तू विकून धंदा वाढवतंय
सूचना- चीनमधून आयात वस्तूंवर कर आकारणीचं स्वतंत्र धोरण आखायला हवं. तरच भारतीय उद्योग टिकतील.

निरीक्षण- 2016-17 साली चीननं कर बुडवून 1024 कोटींच्या चिनी वस्तू बाजारात आणल्या
सूचना- चिनी वस्तू भारतात आणताना त्याची डोळ्यांत तेल घालून तपासणी व्हायला हवी

निरीक्षण- भारतातील खेळणी, घरगुती वस्तू अशा  असंघटित किरकोळ बाजारात चिनी वस्तूंचा मोठा व्यापार आहे 
सूचना- चिनी वस्तूंवर ज्यादा करआकारणी करून भारतातील कच्चा मालावरचा कर कमी करणं

निरीक्षण- भारतातील 90 टक्के औषध उद्योग चीनवर अवलंबून आहे
सूचना- भारतातील औषध उद्योगांना प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी दूरगामी धोरण आखायला हवं
मुळात चीन हा देश उद्योगात अमेरिकेशी स्पर्धा करतोय, मात्र त्यासाठी भारतासारख्या देशांना टार्गेट करून स्वत:चा धंदा वाढवतोय. चीननं भारतातील बाजारांचा अभ्यास करून जी घुसखोरी केलीय ती आपल्या उद्योगांचा गळा घोटतेय. त्यामुळे प्रत्येक भारतीयानं चिनी वस्तूंचा वापर करताना दहावेळा विचार करायची गरजय. आणि त्याचसोबत चीनच्या धंदेवाईकपणाला धक्का देण्यासाठी सरकारी पातळीवरही ठोस पावलं उचलायला हवीत. मेड इन चायनाला मेड इन इंडियाचा धक्का आता द्यायलाच हवा.


संबंधित बातम्या

Saam TV Live