कोरोनावर संशोधन करणाऱ्या चीनी शास्त्रज्ञाची अमेरिकेत हत्या, हेही चीनचंच कारस्थान असल्याचा संशय

साम टीव्ही
गुरुवार, 7 मे 2020
  • कोरोनावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाची हत्या
  • चीनी संशोधकाची अमेरिकेत हत्या
  • वुहानसंबंधी महत्वाचं संशोधन करणाऱ्याची हत्या

अमेरिकेतून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. कोरोनावर संशोधन करणाऱ्या चीनी शास्त्रज्ञाची अमेरिकेत हत्या करण्यात आलीय. नेमकं काय घडलंय ? पाहा

अमेरिकेत एका चीनी संशोधकाची हत्या करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे वुहानसंबंधी हा शास्त्रज्ञ महत्त्वाचं संशोधन करत होता. वुहानमधून व्हायरसची उत्पत्ती झाली का यासंबंधी हा चीनी शास्त्रज्ञ अमेरिकेत संशोधन करत होता. आपल्या संशोधनाच्या अखरेपर्यंत हा संशोधक आला होता.

मात्र त्याआधीच त्याची अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया इथं गोळी झाडून हत्या करण्यात आलीय. पिट्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक असलेले ३७ वर्षीय बिंग लिऊ हे रॉस टाऊनशीप इथल्या आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले आहेत.

एकीकडे वुहानमधून कोरोनाचा प्रसार झालाच नाही, असं चीन वारंवार म्हणतोय, दुसरीकडे वुहानमधून कोरोनाचा प्रसार केला गेला, यासंबंधीच्या संशोधनात बिंग लाऊ अंतिम टप्प्यात पोहचले होते. प्राध्यापक बिंग लिऊ यांच्या डोक्यात गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे हा मृत्यू नैसर्गिक नक्कीच नाही. साहजिकच कपटीपणामुळे जगभरात कुप्रसिद्ध असणाऱ्या चीनकडे संशयाची सुई जातेय.


संबंधित बातम्या

Saam TV Live