चीनी सैन्यानं सुरु केलाय युद्ध सराव, चीनी ड्रॅगनचा नवीन कावा

साम टीव्ही
बुधवार, 20 मे 2020
  • चीनी सैन्याची लडाख सीमेवर हालचाल
  • चीनी सैन्याने सुरू केला युद्धसराव
  • कोरोनाच्या आरोपावरून लक्ष हटवण्यासाठी चीनचा कावा

कोरोनाबाबतच्या आरोपावरून चीनी ड्रॅगन अडचणीत आलाय. या आरोपावरून लक्ष हटवण्यासाठी आता चीनने नवाच डाव आखलाय.

कोरोना विषाणूचा प्रसार संपूर्ण जगात होण्याला चीनच जबाबदार असल्याचा आरोप होतोय. त्याची चौकशी करण्याची मागणीही आता आंतरराष्ट्रीय पातळीवरून केली जातेय. अशा वेळी या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी चीन तणावाची परिस्थिती निर्माण करण्याच्या बेतात आहे. लडाख सीमेवर चीनने मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव सुरू केलीय. 
फक्त एवढच नव्हे तर या आठवड्यात चिनी सैनिकांनी याच भागात युद्ध सरावही केला. आणि सीमेवरील गस्तही वाढवलीय.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दौलत बेग ओल्डी या भागात गेल्यावर्षी भारताने बांधलेला रस्ता चिनी सैन्याचं संभाव्य लक्ष्य असू शकतो. उत्तर सब सेक्टरसाठी हा रस्ता म्हणजे जीवनवाहिनी मानला जातो. शिवाय युद्धकालीन परिस्थितीत या रस्त्याचा भारतीय सैन्यालाही फायदा होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेता चीनला रोखण्यासाठी भारतानेही या परिसरात सैन्यसज्जता चालवलीय. 

कोरोनाच्या या संकट काळात खरंतर सीमेवरील तणाव भारताला परवडणारा नाही. पण चीनने आगळीक केल्यास त्याला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे.

Web Title - Chinese troops begin preperation for war


संबंधित बातम्या

Saam TV Live